तारिक कुरैशी : प्रकरण प्रजासत्ताकदिनी पत्रिकेवर उलटे राष्ट्रध्वज छपाईचेतुमसर : पालिकेने छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रध्वज उलटा छापण्यात आला. याप्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरु आहे. राजकीय सुडबुद्धीने हालचाली सुरु असून त्याला प्रत्यूत्तर देण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी पत्रपरिषदेत दिला.तुमसर पािलका प्रशासनाने प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली. यात तिरंगा उलटा छाछापण्यात आला. याप्रकरणी भाजुमोच्या निवेदनावरून पोलिसांनी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाब नगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन गुन्हे मागे घेण्याचे निवेदन दिले.निमंत्रण पत्रिका छापल्यावर नगरपरिषद कर्मचारी रमाई प्रिंटर्समध्ये पत्रिका घेऊन जाण्याकरिता आले होते. याचे चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये आहे. रमाई प्रिंटर्सकडे कार्यादेश नाही तथा प्रुफ रिडींगचे तपासणी प्रमाणपत्र नाही, हा धागा आयोजकांनी पकडला आहे. लहान गावात असा आदेश घेतला किंवा दिला नाही. ओळखी व विश्वासाने कामे केली जातात.नगराध्यक्षांनी या प्रकरणी माफी मागितल्यावर विषय संपला होता. नंतर आयोजकांनी प्रकरण उकरून काढण्याचे कारण नव्हते. भाजयुमोचा पदाधिकारी अमित चौधरी व रमाई प्रिंटर्सच मालक मनोजहुकरे यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी असा दबाव आणला जात आहे. कदापी खपवून घेणार नाही. नियमानुसार व कायद्यानुसार येथे चौकशी व कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केली आहे. पत्रपरिषदेत भाजयुमो महामंत्री अमित चौधरी, मनोज उकरे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
पडद्यामागील हालचालींना चोख प्रत्युत्तर देणार
By admin | Published: January 31, 2016 12:33 AM