कोरोना आजारातून बरे झाला असाल तर आपल्या शरीरात कोरोनाविरुद्ध लढण्याकरिता रोगप्रतिकारक क्षमता निर्माण झाली आहे किंवा नाही हे ॲन्टिबॉडीज तपासणीच्या माध्यमातून आपण माहिती करून घ्यावी तसेच जर ती झाली असल्यास जास्तीत जास्त प्रमाणात प्लाझ्मादान करून आपण कोणाला तरी जीवनदान देऊ शकतो. यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.
प्लाझ्मादानासाठी कमीतकमी १७ वर्ष पूर्ण असावेत. कमीतकमी ५० किलो वजन असणे आवश्यक आहे. कोरोना संक्रमण झालेले असावे. कोरोना संक्रमणातून बरे होऊन २८ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. स्वास्थ व शरीर प्रकृती चांगली असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीस दुसरे कोणतेही जिवाणू विषाणूजन्य संक्रमण झालेले नसावे. प्लाझ्मादान अत्यंत सुरक्षित आहे. अधिक माहितीसाठी संजय एकापुरे, संजय चौधरी, कुणाल न्यायखोर, मंगेश वंजारी, नितीन तुमाने, रोशन काटेखाये, पवन मस्के, गोवर्धन निनावे यांच्याशी संपर्क साधावा.