लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले.राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासाठी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचेच्या वतीने निवेदन देण्यात आले.जुनी पेन्शन पूर्ववत लागू करावी व इतर प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलै रोजी विविध कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत घोषणा देत ‘लक्षवेधी दिन’ साजरा करण्यात आला.कर्मचाºयांतील असंतोषाचा अंत न पाहता सकारात्मक निर्णय घेऊन, मृत कर्मचाºयांच्या कुटूंबियांना न्याय द्यावा, १ नोव्हेंबर नंतरच्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना व इतर मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली.यावेळी सुधीर माकडे, अमोल जांभुळे, मकरंद घुगे, उत्तम कुंभारगावे, विवेक तवले, भोजराज दिघोरे, पी. बी. खेकरे, अंशुमन पंधरे, एस. एम. पठाण,निलेश तुळसकर, श्रीगणेश जयस्वाल, मुकेश बावनकर प्रशांत घाटबांधे, राहुल द्विवेदी, एस. के. गंगटे, रजनी तेलमासरे, एम. एस. ठवकर आदी पेन्शन हक्क संघटनेचे सभासद उपस्थित होते.
जुनी पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:58 AM
जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीचे निवेदन शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांंनीे पवनी येथील तहसीलदार यांना दिले. राज्यातील शासकीय व निमशासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व ८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी,
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पवनीच्या जुनी पेन्शन हक्क संघटना पदाधिकाऱ्यांची मागणी