तज्ज्ञ प्रशिक्षित एमबीबीएस, एमडी डॉक्टरांद्वारे उपचार केल्यास मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल असा तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार विनंती करूनदेखील ते कोविड १९ सारख्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना मागे ठेवून अप्रशिक्षित डॉक्टरांना पुढे करत आहेत. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूपासून बालकांना वाचवायचे असेल तर कोरोना केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ अशा एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची नियुक्ती करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे पँथर स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे लेखी निवेदन जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे व विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठविली आहे. याप्रसंगी रिपब्लिकन पँथर संघटनेचे विशाल उकरे, विनय घोलपे, पूनम वरखडे, रिता बिनझाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 4:36 AM