२६ लोक ०४ के
तुमसर : तुमसर तालुक्यातील चिखला माईन येथील खाणीत प्रशिक्षण घेतलेल्या २८ शिकाऊ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित रहावे लागत असल्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी लिखित स्वरूपात तक्रार दिली व मदतीची विनंती केली. या अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी चिखला माईन येथील खाण अभिकर्ता राजेश भट्टाचार्य यांना प्रशिक्षणार्थी उमेदवारांना घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरण निदर्शनास आणून दिले. या प्रशिक्षणार्थी उमेदवारांमध्ये डिजल मायक्निकल, फिटर, इलेक्ट्रिशीयन, मॅकेनिकल व कोपा अशा विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले उमेदवार उपस्थित होते.
वर्ष २०२० ते २०२१ यावर्षी प्रशिक्षण घेतलेले शिकाऊ उमेदवारांची नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग नवी दिल्लीच्या माध्यमातून परीक्षा घेणे अपेक्षित होते. परंतु, चिखला माईन येथील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे सदर शिकाऊ उमेदवारांचे फॉर्म भरून घेतल्यानंतरही २८ उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावे लागत आहे. सदर शिकाऊ उमेदवारांचे हित लक्षात घेता त्यांना यावर्षीच परीक्षेत बसता यावे, यासाठी कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा शिकाऊ उमेदवारांना न्याय न मिळाल्यास शिवसेना आंदोलनात्मक भूमिका घेईल व या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मोईल प्रशासनाची राहील, अशी शिवसेनेने दिलेल्या निवेदनातून मोईल प्रशासनाला इशारा दिला आहे.
निवेदनाची प्रत राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, मोईलचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद चौधरी व भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांना देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर कोतपल्लीवार विभागप्रमुख अमित मेश्राम, , जगदीश त्रिभुवनकर, प्रशिक्षणार्थी मोहिनी मडावी, संतोषी भुरे, अचल बोरकर, संतोषकुमार झोडे, अतुल भिवगडे, कोमल जिभकाटे, प्रदीप आचारकते, अवन सोनकालिहारी, राहुल बांडेबूचे, कुणाल चौरे, हेमंत नौखरे, शैलेश मेश्राम, निखिल मानापुरे, रोहित पराते, राहुल मालाधरी, शैलेश कुंभरे, आदेश मदनकर, चंदेश खंगार, राहुल गाढवे, अतुल अवतारे, नितीन वरखडे, पंकज सिरसाम, सचेंद्रकुमार चौधरी, स्वप्नील परतेती, दीपक संरगडे, शिवण घिदोल, राहुल सेलोकर, अंकुश हटवार यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कोट:
या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या शिकाऊ उमेदवारांची माहिती मोईलने यापूर्वी ऑनलाईन पाठविलेली होती. परंतु, नव्याने सॉफ्टवेअर पोर्टल अपग्रेट झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. याप्रकरणी आमच्याकडून वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरू आहे.
- आशिष सूर्यवंशी, सहाय्यक शाखा प्रबंधक चिखला माईन.