भंडारा जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात ९१ लाख ६१ हजार ७५३ लिटर दारूची विक्री झाली हाेती. त्यात देशी दारू ६८ लाख सहा हजार ५२६ लिटर, विदेशी दारू १५ लाख २ हजार ९५२ लिटर, बिअर ८ लाख ३७ हजार २३० लिटर आणि वाइन १४ हजार ३७५ लिटरचा समावेश आहे. तर २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ८१ लाख ४३ हजार ४३६ लिटर दारू विकण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात मद्य विक्रीत घट येईल अशी अपेक्षा हाेती; परंतु मद्य विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे देशी दारूच्या विक्रीत गतवर्षी २३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली हाेती. मात्र बिअर आणि विदेशी दारूची मागणी घटल्याचे दिसून आले. यावर्षी एप्रिल महिन्यात २ लाख ७६ हजार ४८० लिटर दारूची विक्री झाली असून, त्यात एक लाख ८३ हजार ९२६ लिटर देशी दारूचा समावेश आहे. एकट्या एप्रिल महिन्यात माेठ्या प्रमाणात दारू विकली गेली.
-------------------------------
भंडारा : काेराेना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत एकट्या एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यात तब्बल दाेन लाख ७६ हजार ४८० लीटर दारुची विक्री झाली. यात सर्वाधिक विक्री देशी दारुची आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेत गतवर्षी एपि्रल महिन्यात एकही दारु विक्री झाली नव्हती. दारु दुकाने बंद असली तरी पार्सल सुविधेने मद्यपींची चांगलीच साेय झाली.
भंडारा जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात ९१ लाख ६१ हजार ७५३ लीटर दारुची विक्री झाली हाेती. त्या देशी दारु ६८ लाख सहा हजार ५२६ लीटर, विदेशी दारु १५ लाख २ हजार ९५२ लीटर, बिअर ८ लाख ३७ हजार २३० लीटर आणि वाईन १४ हजार ३७५ लीटर झाली हाेती. तर २०१९-२० मध्ये जिल्ह्यात ८१ लाख ४३ हजार ४३६ लीटर दारु विकण्यात आली. लाॅकडाऊनच्या काळात मद्यविक्रीत घट येईल अशी अपेक्षा हाेती. परंतु मद्यविक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे देशी दारुच्या विक्रीत गत वर्षी २३ टक्के वाढ नाेंदविण्यात आली हाेती. मात्र बिअर आणि विदेशी दारुची मागणी घटल्याचे दिसून आले. यावर्षी एपि्रल महिन्यात २ लाख ७६ हजार ४८० लीटर दारुची विक्री झाली असून त्यात एक लाख ८३ हजार ९२६ लीटर देशी दारुचा समावेश आहे. एकट्या एप्रिल महिन्यात माेठ्या प्रमाणात दारु विकली गेली.