निवेदनाची दखल नाही : फ्रीडम संघटना उतरणार आंदोलनात
साकोली : शहरातील प्रभाग सहामधील डाकघर मागे गुप्ता कॉलनीत नळ पाईपलाईन कित्येक महिन्यापासून फुटली असून त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत १०-१२ दिवसाअगोदर फ्रीडमवतीने नगरपरिषदेत ही समस्या त्वरित सोडवा, असे निवेदन सादर केले होते. पण कोणतीही कारवाई येथे केली नसून आता फ्रीडम संघटना वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशारा फ्रीडम संघटना अध्यक्ष किशोर बावणे व आशिष गुप्ता यांनी दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग न्यायालयासमोर डाकघर मागील गुप्ता कॉलनीत मार्गावरच पाईपलाईन फुटली असून दररोज प्रभागात हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येथे पावसाळ्यात इतरत्र पाणी साचून त्यात डास, किड्यांचा प्रादूर्भावाने लहान बालकांसह जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. गंभीर समस्यांचे निवेदन देऊनही नगरपरिषदेने कोणतीच दखल घेतली नाही. आता याबाबद फ्रीडम टैलेंट एकडमीचे अध्यक्ष किशोर बावणे, आशिष गुप्ता व सदस्यांनी नगरपरिषदेने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा नगरपरिषदेविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.