लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी शहर व ग्रामीण परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. साथ झपाट्याने पसरत असल्याने काँग्रेस कमेटीच्या कार्यकर्त्यांनी वेळवा गावातील रुग्णांना भेट देवून माहिती घेतली. रुग्णांना नागपूर किंवा भंडारा येथे जावून उपचार घ्यावा लागत आहे. रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नाही. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्यास बाधीत रुग्णांची रक्त तपासणी करून त्यांना ग्रामीण रुग्णालयात वेगळ्या वॉर्डात भरती ठेवण्यात यावे, अशी मागणीपवनी शहर काँग्रेस कमेटीतर्फे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदागवळी यांना भेटलेल्या शिष्टमंडळात जिल्हा परीषद भंडाराचे माजी सभापती विकास राऊत, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, अ.भा. मच्छीमार काँग्रेसचे सचिव प्रकाश पचारे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव तेलमासरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहरराव उरकुडकर, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ताराबाई नागपुरे, पं.स. सभापती बंडू ढेंगरे, नगरसेवक ताराचंद तुळसकर, वंदना नंदागवळी, राकेश बिसने, इंटकचे सदस्य प्रकाश भोगे, तालुका कामगार सेलचे अध्यक्ष अवनती राऊत, काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष शंकरराव मुनरतीवार, जयपाल नंदागवळी, सुरेंद्र रायपुरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नंदागवळी यांचेसह झालेल्या चर्चेदरम्यान बाधीत रुग्णांसाठी वेगळ्या वॉर्डाची सोय करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. महालॅबकडे रक्त तपासण्याचे काम दिलेले असल्याने स्थानिक पातळीवर रक्त तपासणी केल्या जात नाही. संगणकाची सोय झालेली नाही. त्यामुळे रिपोर्ट मिळायला उशिर लागतो. तसेच ग्रामीण रुग्णालयात पुरेसा औषधीसाठा नाही व नियमित वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी कमी आहेत अशी माहिती मिळाली. त्यानंतर मागणीचे निवेदन स्थानिक लोक्रतिनिधींना पाठविले आहे.
डेंग्यूसदृश रुग्णांची इतरत्र व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 10:24 PM
पवनी शहर व ग्रामीण परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. साथ झपाट्याने पसरत असल्याने काँग्रेस कमेटीच्या कार्यकर्त्यांनी वेळवा गावातील रुग्णांना भेट देवून माहिती घेतली. रुग्णांना नागपूर किंवा भंडारा येथे जावून उपचार घ्यावा लागत आहे.
ठळक मुद्देवैद्यकीय अधीक्षकांना निवेदन : पवनी शहर काँग्रेसची मागणी