शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

पंप चालण्याकरिता सौर ऊर्जेची व्यवस्था करणार

By admin | Published: November 15, 2016 12:32 AM

सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही,..

दिलीप बंसोड : बरबसपुरा येथे स्ट्रीट लाईट व लावणीचे उद्घाटनकाचेवानी : सरपंच लिचडे यांनी वीज समस्येमुळे तीनचार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, अशी समस्या मांडत सौर ऊर्जेची व्यवस्था अदानी फाऊंडेशनने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. यावर ही मागणी अदानी व्यवस्थापनाशी बोलून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन माजी आ. बन्सोड म्हणाले.बसबसपुरा येथे तिसऱ्या मंडईनिमित्त जय बजरंग नाट्य मंडळाद्वारे लावणी कार्यक्रम घेण्यात आले. लावणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन माजी आ. दिलीप बन्सोड यांच्या हस्ते, धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. रंगमंच पूजन अदानी फाऊंडेशनचे नितीन शिरवाडकर यांच्या हस्ते झाले. अतिथी म्हणून पं.स. सदस्य संध्या गजभिये, तंमुसचे अध्यक्ष मंसाराम उईके, साहेबराव रिनाईत, सरपंच ममता लिचडे, उपसरपंच डी.पी. रहांगडाले, ग्रामपंचायत सदस्य नरेश असाटी, नेतराम माने, तेजराम चौधरी, दिलीप मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक सरपंच ममता लिचडे यांनी केले. त्यांनी गावातील वीज समस्या व पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी अदानी पॉवरने सौर ऊजेची मदत करावी, अशी मागणी केली. पं.स. सदस्य संध्या गजभिये यांनी, महिलांनी कोणत्याही सभेत पुढाकार घेवून विकासकार्यात सहभागी व्हावे. महिलांनी गटांमार्फत लघू उद्योगाकडे भर द्यावे, असे त्या म्हणाल्या. तर अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिरवाडकर यांनी, बरबसपुरा गावा विसरले नसून ज्या समस्या सोडविता येतील, त्या सोडवू, असे आश्वासन दिले. गुमाधावडा येथे मशरूम उद्योग महिलांनी सुरू केला. तसा सर्व महिलांनी लघू उद्योग करून कुटुंबास आर्थिक बळकटी देण्याचा सल्ला दिला.धनवर्षा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश कटरे यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमाने कलेचे महत्व सांगितले. आरोग्य व आर्थिक बाबींवरही त्यांनी मार्गदर्शन केले. माजी आ. दिलीप बन्सोड यांनी बरबसपुरा गावाच्या विकासासाठी सरपंच ममता लिचडे व सहकाऱ्यांची प्रसंशा केली. आपण वेळोवेळी सहकार्य केले व करत राहू, असे सांगितले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमाने घरी लघुद्योग करावा. आरोग्य उत्कृष्ट ठेवण्याकरिता मनोरंजन आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय व नियमित विद्युत पुरवठा आवश्यक आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. (वार्ताहर)