लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जैन आचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांची मुनी समूहासोबत रामटेकहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे पदयात्रा सुरू आहे. या पदयात्रेदरम्यान शनिवारला सकाळी ७ वाजता त्यांचे भंडारा येथे आगमन झाले. दरम्यान विद्यासागर महाराज हे भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात आले. त्यावेळी त्यांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली.यावेळी निखिल राजेंद्र जैन, राजकुमार जैन, जितेंद्रकुमार जैन, विजय जैन, महेंद्र जैन, स्वप्नील नशीने, पंकज ठवकर, अक्षय पवार, भानुदास बनकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य कार्तिक पनीकर, शैलेश तिवारी, रूपेश मोहतुरे, जी. डी. भोकरे, अरूण झिंगरे, रवि लाडे, दादाराम मेहर व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालय परिसरात महाराजांनी १५ मिनिटे घालविल्यानंतर मुनीसंघासोबत भिलेवाडा येथील पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात पोहोचले. तिथे आहार घेऊन लाखनीकडे रवाना झाले.संपूर्ण जीवन कठिण तप करणारे आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी अनेक धार्मिक ग्रंथांची रचना केली आहे. त्यांचे हे ग्रंथ विविध शिक्षण संस्थानांनी हिंदी अभ्यासक्रमात समाविष्ट आहे. आचार्य विद्यासागरजी महाराज विविध सामाजिक कार्याचे प्रेरणास्त्रोत आहेत. गोशाळेचे निर्माण, गोरक्षण, हातमागाच्या माध्यमातून जनजागृती त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘इंडिया नही-भारत कहो’चा नारा देणारे विद्यासागरजी महाराज प्रतिदिवस २० किलोमीटर पदयात्रा करतात. ते दिवसातून एकदाच उभे राहून अन्नग्रहण करतात.
विद्यासागरजी महाराजांचे भंडाºयात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:46 PM
जैन आचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांची मुनी समूहासोबत रामटेकहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे पदयात्रा सुरू आहे.
ठळक मुद्देविद्यासागर महाराज हे भंडारा येथील जे.एम. पटेल महाविद्यालयात आले.