लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकापेक्षा एक सरस नृत्य, सामाजिक संदेश देणारे पथनाट्य आणि विविध कलागुणांची उधळण करणारा सखी महोत्सव येथील मंगलमुर्ती सभागृहात उत्साहात पार पडला. सखींच्या प्रचंड उपस्थितीत स्पर्धकांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.सखी महोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक संजय कुंभलकर व पुजा कुंभलकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष आशु गोंडाने, नितीन धकाते, कृणाल न्यायखोर, विलास शेंडे, लोकमत जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, लोकमत समाचार जिल्हा प्रतिनिधी शशीकुमार वर्मा, शाखा व्यवस्थापक मोहन धवड उपस्थित होते.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संस्थापक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरूवात झाली.यावेळी घेण्यात आलेल्या अभिनय स्पर्धेत प्रथम डॉ. विशाखा जिभकाटे, द्वितीय भारती तितीरमारे तर तृतीय क्रमांक सीमा झंझाड आणि डॉ. ऋतुजा राठी व सुषमा बावनकर यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार पटकाविला. पथनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक नारी शक्ती नाटीकेने, द्वितीय पहेला येथील सखींनी स्त्री भृणहत्येवर आधारीत नाटिका सादर करून पटकाविला. तर तृतीय क्रमांक उगवली पहाट या नाटिकेने पटकाविला.एकलनृत्य स्पर्धेत प्रथम सोनाली कुंभारे, द्वितीय मृणाली खोब्रागडे, तृतीय निधी परिहार यांनी तर प्रोत्साहनपर पुरस्कार शिल्पा लिचडे, उज्वला पोवळे यांनी पटकाविला. युगल नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रिती मुळेवार व प्रियंका काकपुरे, द्वितीय क्रमांक सोनाली भाजीपाले व रविना सतदेवे यांनी तर तृतीय क्रमांक प्रिती हलमारे व अश्विनी टिचकुले या जोडीने पटकाविला.समुहनृत्य स्पर्र्धेत संकल्पग्रृपने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांच्या बहारदार नृत्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. द्वितीय क्रमांक राधाकृष्ण ग्रृप तर तृतीय क्रमांक साही ग्रृप व फनीडॉन्स ग्रृपला संयुक्तरित्या देण्यात आला. प्रोत्साहनपर बक्षीस क्रिऐटीव्ह ग्रुपने पटकाविला. परिक्षण नवनीत गोल्लर व प्रशांत वाघाये यांनी केले.सखी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यात बुके मेकिंगमध्ये प्रथम प्राची कवडे, द्वितीय मैथिली इंगळे, तृतीय आरती पराते यांनी तर प्रोत्साहनपर पुरस्कार देवयानी हुमणे, मीना खोत यांनी पटकाविला. मेहंदी स्पर्धेत प्रथम पायल निपाने, द्वितीय कल्याणी बोरकर, तृतीय प्रियंका बडवाईक यांनी तर प्रोत्साहनपर पुरस्कार सपना गभने, पूजा बारापात्रे यांनी पटकाविला. रांगोळी स्पर्धेत प्रथम जयश्री पराते, वैशाली मेहर, द्वितीय अंजली गडरिये, तृतीय उज्वला मस्के यांनी तर प्रोत्साहनपर पुरस्कार घोडेस्वार व भारती बारई यांनी पटकाविला. सलाद डेकोरेशन स्पर्धेत प्रथम अल्का खराबे, द्वितीय अर्पणा किटे, तृतीय अंजली गडरिये यांनी तर प्रोत्साहनपर पुरस्कार जयश्री पराते व प्रतिभा गंदे यांनी पटकाविला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून संपदा चुटे, कल्पना शेट्टी, संघमित्रा मस्के, संगिता सुखानी, ज्योती बुरावत व प्रिती बुरावत यांनी काम पाहिले.संचालन सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी तर आभार बाल विकास मंचचे जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शहरातील सर्व सखी विभाग प्रतिनिधींनी सहकार्य केले.
सखी महोत्सवात कलागुणांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 10:06 PM
एकापेक्षा एक सरस नृत्य, सामाजिक संदेश देणारे पथनाट्य आणि विविध कलागुणांची उधळण करणारा सखी महोत्सव येथील मंगलमुर्ती सभागृहात उत्साहात पार पडला. सखींच्या प्रचंड उपस्थितीत स्पर्धकांवर बक्षीसांचा वर्षाव करण्यात आला.
ठळक मुद्देबक्षीसांचा वर्षाव : बहारदार नृत्य व पथनाट्यातून सामाजिक संदेश, स्पर्धांच्या मेजवानीचा लुटला प्रेक्षकांनी आनंद