लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भर पावसाळ्यात मोहाडी तालुक्यातील करडी येथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीच्या कामात जुनेच पाईपलाईन वापरण्यात आल्याने पाईपला गळती लागली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड झाल्यानंतर चक्क पाणीपुरवठाच बंद करण्यात आला. त्यामुळे गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.मोहाडी तालुक्यातील करडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद विद्यालयाजवळ पाण्याची टाकी आहे. दोन कि़मी. अंतरावरील मुंढरी येथे विहिर खोदून पाईपद्वारे टाकीपर्यंत पाणी आणले जाते. सदर योजना वारंवार त्रासदायक ठरत होती. गत पाच वर्षात अनेकदा पाईपलाईनही बदलविण्यात आले. परंतु योग्य काम न झाल्याने पाईपलाईनमध्ये वारंवार बिघाड होतो. यावर कायमस्वरूपी उपाय योजनासाठी करडी ग्रामपंचायती अंतर्गत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर करण्यात आले. त्यासाठी तीन लाख रूपयांचा निधीही मंजूर झाला. उन्हाळ्यात दुरूस्तीचे काम करण्यात आले. या कामात ६० नवीन पाईप योग्य खोलीवर टाकणे गरजेचे होते. परंतु काम सदोष करण्यात आले. केवळ २२ नवीन पाईप टाकून इतर जुनी पाईपलाईन जशीच्या तशी ठेवण्यात आली. त्यामुळे कामावरून दोन महिने लोटत नाही तोच मोठ्या प्रमाणात पाईप फुटण्यास प्रारंभ झाला.नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होवू लागला. त्यामुळे नागरिकांनी ओरड सुरू केली. शेवटी गावचा पाणीपुरवठाच बंद करण्यात आला. त्यामुळे भर पावसाळ्यात करडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायत सदस्यांनी केली चौकशीची मागणीसदोष पाईपलाईन प्रकरणी चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य वैशाली सेलोकर, अनमोल डोहळे, माजी उपसरपंच चंद्रकांत सेलोकर, रोशन बारेवारे, राधेश्याम कावळे, मोहन किरणापुरे यांनी केली आहे.सदर पाईपलाईन दुरूस्तीचे कंंत्राट ग्रामपंचायत सदस्य भास्कर गाढवे यांना देण्यात आले. उन्हाळ्यात नवीन पाईपलाईनचे काम करण्यात आले. पाईप उखडत असल्याने लवकरच दोष दुरूस्त करण्यात येतील. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.-गौरीशंकर सिंदपुरे,उपसरपंच करडी.
भर पावसाळ्यात करडी येथे कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:30 PM
भर पावसाळ्यात मोहाडी तालुक्यातील करडी येथील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुरूस्तीच्या कामात जुनेच पाईपलाईन वापरण्यात आल्याने पाईपला गळती लागली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्याची ओरड झाल्यानंतर चक्क पाणीपुरवठाच बंद करण्यात आला.
ठळक मुद्देसदोष पाईपलाईन : जुनेच पाईप वापरल्याचा आरोप