मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत १४ तासापासून रिमझीम पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नसतानाही देव्हाडी उड्डाणपुलातून पुन्हा राख वाहू लागली आहे. तुमसर मार्गावरील उड्डाणपुलावर खड्डे पडणे सुरू झाले आहे. संपूर्ण पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण दिसत असून भविष्यात वाहतूक करणे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. प्ूुल बांधकामाची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी होत आहे.पाच वर्षापूर्वी देव्हाडी रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपूल बांधकामास सुरुवात करण्यात आली. दरम्यान तुमसर-गोंदिया-मन्सर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला. त्यामुळे सदर महामार्गावर जड वाहतुक मोठ्या प्रमाणात राहणार हे निश्चित आहे. देव्हाडी येथे पुलाचे बांधकाम करताना त्यात भरावासाठी फलॅयअॅश (राख) घालण्यात आली. रिमझीम पावसात पुलातून पाणी झिरपत आहे. त्यामुळे भरावातील राख मोठ्या प्रमाणात पुलाबाहेर वाहत आहे. राख वाहून गेल्यावर तेथे जागा पोकळ होत आहे. आतुन पोकळ झाल्याने वाहतूक सुरु झाल्यानंतर हा पूल अत्यंत धोकादायक ठरणार आहे. येथील पुलावरील डांबरीकरण उखडून जागोजागी खड्डेपडले आहे. उद्घाटनापुर्वी पुलावर खड्डेपडल्याने पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.या गंभीर प्रकरणाची दखल जिल्हाधिकारी डॉ. नरेश गित्ते यांनी घ्यावी आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी आहे. आता प्रशासन कोणती भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुलात पाणी शिरणे धोकादायकउड्डाण पूल पोच मार्गा डांबरीकरण करण्यात आला. त्यातून पुलात पाणी सहज शिरत आहे. शिरलेले पाणी पूल भरावातून राख वाहून नेत आहे. येथे दोन्ही बाजुला रस्त्यावर राख साचली दिसत आहे. राख रस्त्यावर दिसू नये म्हणून ती उचलून फेकली जाते. येथे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संपुर्ण पूल पोकर झाल्याची परिसरात चर्चा आहे. पंरतु संबंधित विभागाचे अधिकारी येथे भेट देत नाही. या प्रकरणाची शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे.२४ कोटीच्या पुलातून पाण्यासोबत राख वाहून जात आहे. त्यामुळे पूल पोकर झाला आहे. येथे पूल कोसळण्याची शक्यता आहे. शासन व प्रशासनाने चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी, अपघाताला शासन जबाबदार राहील.-डॉ. पंकज कारेमोरेकाँग्रेस नेते, तुमसर
पावसानंतर उड्डाणपुलातून वाहू लागली राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:57 AM
गत १४ तासापासून रिमझीम पाऊस सुरू आहे. पावसाला जोर नसतानाही देव्हाडी उड्डाणपुलातून पुन्हा राख वाहू लागली आहे. तुमसर मार्गावरील उड्डाणपुलावर खड्डे पडणे सुरू झाले आहे. संपूर्ण पुलाचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण दिसत असून भविष्यात वाहतूक करणे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत.
ठळक मुद्देदेव्हाडी उड्डाणपूल : ठिकठिकाणी पडले खड्डे, जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी