शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By admin | Published: July 15, 2016 12:49 AM

शासन या ना त्या कारणाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने...

पवनी : शासन या ना त्या कारणाने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १ एप्रिलचे काम नाही, वेतन नाही धोरण लागू करण्याकरिता काढलेले शासन परिपत्रक रद्द करावे व विजाभज विमाप्र आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याकरिता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयासमोर महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघातर्फे मोठे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात भंडारा जिल्ह्यासह राज्यातून हजारो कर्मचारी सहभागी होणार आहेत. १ एप्रिलचा अन्यायकारक जीआर रद्द करावा, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे समायोजन करावे, आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना १ तारखेला वेतन दयावे, विजाभज आश्रमशाळा संहिता तात्काळ मंजूर करुन लागू करावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती वेतनश्रेणी लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागु करावी आदी मागण्यांकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील जवळपास १००० आश्रमशाळा कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. गेली अनेक वर्षे काम करुन वेतन घेत असलेल्या या कर्मचारी वर्गावर अचानक शासनाने अतिरिक्तचा शिक्का मारुन वेतन थांबविल्याने सांगा कस जगायच असे म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यात स्वयंसेवी संस्थाकडून विजाभज विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक ५२६, माध्यमिक २९६ व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असून १२,५३८ कर्मचारी कार्यरत आहेत. मोठ्या संख्येने कर्मचारी अतिरिक्त झाल्यामुळे शासनाने या जीआरचा आधार घेवून त्यांचे वेतन थांबविले आहे व सेवासमाप्तीचा बडगा उभारला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट होवून त्यांच्यात शासनाविषयी रोष निर्माण झाला आहे. १८ जुलैच्या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य संघटनेचे अध्यक्ष गोविंद गुजाळ, एकनाथ देशमुख, देवेंद्र नाकाडे, अरविंद लाडेकर, अनिता चव्हाण, लक्ष्मीकांत तागडे आदी करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)