आॅनलाईन लोकमतभंडारा : महिनाभरापासून उत्सुक्ता लागलेल्या भंडारा नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी अविरोध पार पडली. यात उपाध्यक्षपदाची माळ भाजप संयुक्त आघाडीचे आशिष राधेश्याम गोंडाणे यांच्या गळ्यात पडली.नगर पालिका सभागृहात सकाळच्या सत्रात उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी प्रणित आघाडीचे उमेदवार सुनिल साखरकर तर भाजप प्रणित आघाडीचे उमेदवार आशिष गोंडाणे यांनी अर्ज सादर केला. त्यानंतर साखरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गोंडाणे यांना अविरोध पालिका उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. निर्वाचक म्हणून नगराध्यक्ष सुनिल मेंढे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी काम पाहिले. गोंडाणे यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी गुलाल उधळून पुष्पहार घालून स्वागत केले.दरम्यान दुपारच्या सत्रात गोंडाणे यांनी पदभार स्वीकारला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, नगरसेवक संजय कुंभलकर, नितीन दुरूगकर, मिलिंद मदनकर, किशोर ठाकरे, भुपेश तलमले, अजय ब्राम्हणकर, रूबी चढ्ढा, नितीन धकाते, राजू व्यास, दिनेश भुरे, राजेश टिचकुले, कैलाश तांडेकर, संतोष त्रिवेदी, अतुल मानकर, चेतन चेटुले, मकसूद बन्सी, यश गुप्ता, रजनीश मिश्रा, चंद्रशेखर खैरे, संजय बांडेबुचे, मोरेश्वर मते यांच्यासह भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.भाजप विरोधकांची दाणादाणउपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपविरूद्ध सर्व विरोधक एकवटले होते. त्यासाठी अनेकांनी महिनाभरापासून फिल्डींग लावली होती. यात सत्तापक्षातील काही सदस्यांनाही उपाध्यक्षपद हवे होते? परंतु सत्तापक्षातील भाजपने विरोधकांवर चांगलीच मात दिली. कालपर्यंत १५ विरूद्ध १८ म्हणणारे आज कुठेही दिसले नाही. त्यासाठी बैठका घेऊन मोर्चेबांधणी सुरू होती. परंतु मंगळवारला सकाळी आशिष गोंडाणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच पक्षातील सर्वच नगरसेवकांनी मतदान केले.
उपाध्यक्षपदी आशू गोंडाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:45 PM
महिनाभरापासून उत्सुक्ता लागलेल्या भंडारा नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी अविरोध पार पडली. यात उपाध्यक्षपदाची माळ भाजप संयुक्त आघाडीचे आशिष राधेश्याम गोंडाणे यांच्या गळ्यात पडली.
ठळक मुद्देभंडारा नगर पालिका : स्वपक्षातील विरोधक हिरमुसले