भंडारा : येथील रहिवासी अश्विनी रमेश महाकाळकर (साखरकर) यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत गणित विषयात आचार्य पदवी (पीएच.डी.) बहाल करण्यात आली. त्याबद्दल भाजप शिक्षक आघाडी, भंडारातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथे मागील १० वर्षांपासून गणित विषयांचे अध्यापन करीत आहेत. आचार्य पदवीकरिता अश्विनी महाकाळकर यांनी विज्ञान शाखेतील गणित विषयांतर्गत ‘सम एस्पेक्ट ऑफ थर्मोडॉयनॉमिक्स बिहेव्हीअर ऑन सॉलिड बॉडीज विथ इंटरनल हीट सोर्सेस’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. यासाठी त्यांना सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. एन. डब्लू. खोब्रागडे यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार प्रसंगी भाजप शिक्षक आघाडीचे पदाधिकारी डॉ. उल्हास फडके, कैलास कुरंजेकर, मेघश्याम झंझाड, माधव रामेकर यांनी त्यांचा पुष्पगुछ देऊन सत्कार व कौतुक केले. याप्रसंगी त्यांचे पती मनीष साखरकर, मुरलीधर साखरकर, नीना साखरकर, मुली सानवी व पारुल साखरकर उपस्थित होते.
अश्विनी महाकाळकर यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 4:34 AM