शेतकरी त्रस्त
प्रतिनिधी भंडारा
जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेने लाखनी,लाखांदूर, साकोली, भंडारा,पवनी, मोहाडी, व तुमसर तालुक्यातील प्रत्येक गावातील पांदन रस्त्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून तत्काळ डांबरीकरण करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची तसदी घ्यावी अशी मागणी भीम शक्ती संघटने ने एका लेखी निवेदनातून केली आहे.
शेतकरी बांधवांना शेतीची मशागत करण्यासाठी दररोज शेतावर आवागमन करावे लागते परंतु शेता शिवारासाकडे जाणारे रस्ते मातीमोल असल्यामुळेरस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असून बैल बंडी व ट्रॅक ट र ने आण करतांना तसेच शेतकरी शेतमजुरांना शेतावर ये जा करतांना कमालीचा शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची दस्तुरखुद्द शेतकरी शेतमजूर बांधवांची ओरड असली तरी संबंधित विभागाचे या रस्त्यांच्या खडीकरण डांबरी करन करण्याकडे हेतुपुरस्सर अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सकृ त पने दिसून येत आहे.
ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.
याप्रकरणी जिल्हा व तालुका प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या यंत्रणेने याबाबत वेळीच दखल घेऊन व सम्यक विचार करून लाखनी लाखांदूर साकोली पवनी भंडारा तुमसर मोहाडी या तालुक्यातील प्रत्येक गावातील पांदन रस्त्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे एस के वैद्य बाळकृष्ण शेंडे हरिदास बोरकर भागवत दामले वामन कांबळे माधव बोरकर हर्ष वर्धन हुमने , संदीप बर्वे बंडू फुलझेले अंबादास नाग दिवे, अरुण ठ व रे,नरेंद्र कांबळे,जयपाल रामटेके,फाल्गुन वंजारी, मनोहर दही व ले,मनोज लांजेवार,यांनी एका लेखी निवेदनातून केली आहे.