भंडारा : विस्तार अधिकारी पंचायत, कृषी व ग्रामविकास अधिकारी तसेच इतर विभागातील पदे पदोन्नतीने भरताना कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. याउलट पात्र उमेदवारांना डावलून पदोन्नतीने भरती करण्यात आली आहे. बदली प्रक्रिया व पदोन्नतीसंबंधाने दिलेल्या कार्यवाहीबाबत माहिती पाठविण्यात यावी अशी मागणी कास्ट्राईब संघटनेने जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, शासन निर्णयानुसार अंमलबजावणी झाली नसल्याने सुधारित सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात यावी. कार्यशाळा घेऊन नव्याने पदोन्नतीची कार्यवाही करण्यात यावी, पात्र कर्मचाऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शामराव नागदेवे, सरचिटणीस नरेंद्रकुमार रंगारी, विलास खोब्रागडे, सुरेश राऊत, सुरेश खोब्रागडे, अनिल धमगाये, शाम बिलवणे, विजय मुळे, निशिकांत घोडीचोर, शालीकराम भलावी, अर्चना मेश्राम, शैलेश नंदेश्वर, घनश्याम मडावी, देवीदास भुजबळ, सी. के. मेश्राम, संदीप जायभाये, अरविंद रामटेके, लिला जनबंधू उपस्थित होते.
संपूर्ण दस्तावेज द्या
सेवाज्येष्ठता यादीनुसार संबंधित पदावर पदोन्नती करण्यात आली ती यादी देण्यात यावी, ज्या सेवाज्येष्ठता यादीनुसार ग्रामसेवकातून ग्रामविकास अधिकारी पदावर पदोन्नती करण्यात यावी ती यादी यासह विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी पदासाठी असलेली सूची यादी द्यावी.