कोंढा-कोसरा : कोंढा परिसरात रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नाने छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सोमनाळा (बु.) या संस्थेला भावडसाठी शासकीय आधारभूत केंद्र मंजूर झाले. या आधारभूत केंद्राचे उद्घाटन आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शिवसेना उपप्रमुख नरेश बोपचे, पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये, उपसरपंच जितेंद्र लिचडे, आशिष माटे, ज्ञानदेव कुर्झेकर, संस्थेचे अध्यक्ष सुधाकर साठवणे, आबाजी देशमुख उपस्थित होते. हे केंद्र कोंढा येथील देविदास पाटील राईस मिल येथे सुरू केले आहे. सोमनाळा, सेंद्री व भावड गावहद्दीत असणाऱ्या शेतकरी बांधवांकरिता आहे. कार्यक्रमासाठी मंगेश तळमले, सूरज भोवते, राजू हटवार, कार्तिक देशमुख, अनिल चिचमलकर, घनश्याम चिचमलकर यांनी प्रयत्न केले.
atmi कोंढा-कोसरा : भावडसाठी शासकीय आधारभूत केंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:35 AM