लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अड्याळ (सौंदड) पुनर्वसन येथे गो तस्कराकडून सौंदड पुनर्वसन येथील शेतकरी, शेतमजुरांवर केलेला हा हल्ला संघटित असून पुर्वनियोजित होता असा आरोप करून जिल्ह्यात पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. अड्याळ येथे छत्तीसगढ व मध्यप्रदेश राज्यातून गायी आणून अन्य ट्रकद्वारे आंध्रप्रदेश, तेलंगाणा व अन्य राज्यामध्ये तस्करी करण्याचा व्यवसाय कित्येक वर्षापासून सुरू आहे. परिसरातील लोकांनी केलेल्या तक्रारीवर पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. त्यामुळे गो तस्करांची हिम्मत वाढत असू या मारहाण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणीअन्यायग्रस्त गो-तस्कर हल्ला पीडित संघर्ष समितीने केली आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, डॉ.संजय एकापुरे, प्रदीप गजभिये, विजय निंबार्ते, जगदीश भुते, मनोज गजभिये, आदेश तितीरमारे, संदीप भुते, प्रमोद देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, घटनेच्या दिवशी ७ जुलैला गोतस्करांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावून तस्करी करूण आणलेल्या गायी बैलांना दुसऱ्या ट्रकमध्ये चढवित होते. गोतस्करांना रस्त्यावरून ट्रक हटविण्याची विनंती केली असता १० ते १२ गो तस्करांनी पुरूषोत्तम केवट (६५) याला लाठ्या काठ्यांनी मारहान केली. या वयोवृद्ध शेतकºयांला वाचविण्यासाठी गावातील अन्य शेतकरी शेतमजुर धावून आले. तेव्हा त्या गोतस्करांनी भारत मेश्राम, सोमा निंबार्ते, चंद्रभान भुते यांनाही मारहाण केली. गावात घुसून हल्ला करण्याची धमकी दिली. लाठ्या काठ्या घेऊन उभे असलेले गो तस्कर व पोलिसांची साथ मिळत नसल्याचे पाहुन गरीब शेतमजुर घरी पळत आले व घाबरून घरात बंद करून घेतले.त्यानंतर या गोतस्करांनी फोनवर संपर्क साधून बाहेरून बोलविलेल्या २५ ते ३० साथीदारांनी घरावर हल्ला केला. दार तोडून घरात शिरले. लोखंडी रॉड व काठ्यांनी अमानुष पद्धतीने वार करत सुटले. यात अनिता गोपाल निंबार्ते ही महिला ८ महिन्याच्या मुलाला दुध पाजत होती. या हल्लेखोरांनी त्या मुलाला उचलून बाजुला फेकले व त्या महिलेची छेडखानी केली. असाच प्रकार चंद्रभान भुते (५५) या व्यक्तीवर झाला. तीन हल्लाखोराने नालीवर पाडून लोखंडी रॉडने त्याच्या पायावर वार केला त्यामुळे त्याचा पाय मोडला. हा वयोवृद्ध शेतमजुर पायावर पुन्हा उभा राहू शकणार नाही. भारत मेश्राम, आदेश तितीरमारे, आभय भुते, जितेंद्र भुते, पुनेश्वर भुते यांच्यावर गो तस्करांनी हल्ले केले. परंतु सुचना देऊनही पोलीस आले नाही.७ जुलैच्या रात्री एकत्रित झालेल्या जमावामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. हे सारे न्याय मागण्यासाठी आले होते. ते हल्लेखोरांवर कार्यवाही करण्याची मागणी करीत होते. परंतु तेथे ही पोलिसांनी चालढकल केली व एकत्रित जमावाला पांगविण्यासाठी दंडूकेशाहीचा आधार घेतला व त्यात अनेकजण जखमी झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ७ जुलैच्या रात्री पोलीस ठाण्यासमोर जमावावर लाठी चार्ज केला नाही, असे सांगितले. परंतु या लाठी हल्ल्यात गुणवंत नागुलकर व इतर १० ते १२ व्यक्तींच्या शरीरावर आलेले व्रण कुठल्या हल्याचे आहेत, हे पोलिसांनी सांगावे, असेही ग्रामस्थांनी म्हटले आहे.घटनेच्या सहा दिवसानंतरही बाबू पटेल, जाबू शेख, कमलेश जाधव हे तीन मुख्य आरोपी पोलिसांना गवसले नाही. जिल्हा पोलिसांनी शोध मोहिम राबवून तीन फरार आरोपींना अटक केली पाहिजे. गो तस्करातील हल्लेखोराविरूद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करणे, प्रकरणातील फरार आरोपी कडून सौंदड पुनर्वसन गावावर हल्ला करण्याची भिती असल्यामुळे तेथे २४ तास सशस्त्र पोलीस पहारा प्रधान करण्यात यावा, या हल्ल्यात जखमी झालेल्या व विकलांग झालेल्या शेतकºयांच्या परिवारास दोन लक्ष रूपयांचे आर्थिक साहयता व उपचारांचा संपूर्ण खर्च सरकारने द्यावा, गुन्हेगारांवर ३०७ कलम लावण्यात यावे, गावामध्ये चालत असलेले गो तस्करांच्या अड्याविरोधात कार्यवाही करण्यात यावी या मागण्यांचा समावेश आहे.
सौंदड येथील ग्रामस्थांवरील हल्ला हा संघटित आणि पूर्वनियोजित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 9:49 PM
अड्याळ (सौंदड) पुनर्वसन येथे गो तस्कराकडून सौंदड पुनर्वसन येथील शेतकरी, शेतमजुरांवर केलेला हा हल्ला संघटित असून पुर्वनियोजित होता असा आरोप करून जिल्ह्यात पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे अवैध व्यवसाय फोफावले आहेत. अड्याळ येथे छत्तीसगढ व मध्यप्रदेश राज्यातून गायी आणून अन्य ट्रकद्वारे आंध्रप्रदेश, तेलंगाणा व अन्य राज्यामध्ये तस्करी करण्याचा व्यवसाय कित्येक वर्षापासून सुरू आहे.
ठळक मुद्देसंघर्ष समितीचा आरोप : ठाणेदार किचक यांना निलंबित करा