शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

जुनी पेंशनसाठी ‘हल्लाबोल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 9:46 PM

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने रविवारी जिल्हाकचेरी समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्यावतीने रविवारी जिल्हाकचेरी समोर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासह विविध नेत्यांनी भेट देत कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा दिला. १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करुन नवीन अंशदायी पेन्शन योजना सुरु केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. जुनी पेन्शन योजना आबाधित ठेवण्यासाठी संघटनेच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडावी, राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, सचिव परमेश्वर येणकीकर, अमोल जांभुळे, सोपचंद सिरसाम, धोंडीराम हाके, विनोद किंडर्ले, दिलीप सोनुले आदी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दिला होता. यात संघटनेचे मुबारक सैय्यद, रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, कालीदास माकडे, व्ही. पी. मुंडे, रवी रेहपाडे, भारत मेश्राम, डॉ. प्रविण टेंभुर्णे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुधीर माकडे यांनी तर संचालन संग्राम केंद्रे व उत्तम कुंभारगावे यांनी केले. आभार धोंडीराम हाके यांनी मानले.