लाखनी (भंडारा) : शहरातील एका खासगी कान्व्हेंट शाळेत शिकविणार्या शिक्षिकेच्या अपहरणाचा प्रयत्न शाळेत विद्यार्थी आणणार्या व्हॅन चालकाने केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी घडली. मात्र पीडितेने प्रसंगावधान राहून तेथून पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. लाखनी पोलिसांनी आरोपीला रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील आरोपीच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली. आशीष सुरेश टेंभुर्णे (वय 30, रा. तलाव वार्ड लाखनी) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील खेडेगावातून शहरात एका खासगी कान्व्हेंट शाळेत शिकविणार्या शिक्षिकेस शाळेत विद्यार्थी आणणार्या व्हॅन चालकाने लाखनी बसस्थानकासमोर पीडितेस व तिच्या मैत्रिणीस गाडीत बसवून लाखनी येथील बाजार समिती समोर गाडी थांबवून पीडितेच्या मैत्रिणीस उतरविले, तेव्हा पीडितासुद्धा उतरली. आरोपी आशीष सुरेश टेंभुर्णे याने पीडितेस जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवून “तू माझ्याशी लग्न न करता दुसर्यासोबत लग्न कशी काय करतेस ?”असे बोलून तसेच डोक्याचे केस पकडून खासगी व्हॅनगाडीमध्ये डांबून अपहरण करून माणेगाव मार्गे आलेसुर, मासलमेटा, खेडेपार कडून लाखोरी गावाजवळील संजय नगर परिसरात आणून पीडितेस उतरविले व स्वत: व्हॅन गाडीसह पळून गेला.पीडितेने ही माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेसह पोलीस स्टेशनमध्ये येऊन घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लाखनीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांनी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी तुकाराम काटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, उपनिरीक्षक रवींद्र म्हैसकर, सहाय्यक उपनिरीक्षक विजय हेमणे, नरेंद्र मुटकुरे पोलिस हवालदार भगवान थेर, दिगंबर तलमले, सुभाष राठोड, पोलिस नायक उमेश शिवणकर, लोकेश ढोक, महिला पोलिस नायक शालू भालेराव, वासंती बोरकर, वर्षा खोब्रागडे पोलिस शिपाई पीयुष बाच्चल, नितिन झंझाड, अनिल राठोड, राजेंद्र लांबट, जितेश रोडगे यांची आरोपी शोध दृष्टीने 3 पथके तयार करून पोलिसांनी रात्री दीड वाजताच्या सुमारास सिंधीपार/ मुंडीपार येथील आरोपीच्या नातेवाईकाच्या घरून अटक केली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी आशीष सुरेश टेंभुर्णे याच्या विरुद्ध अपहरण, विनयभंग सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून थापड भुक्यांनी मारहाण करून तिचा विनयभंगतसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकणी लाखनी पोलिसांनी आरोपी विरूद्ध अप. क्र. ४९/२०२० कलम ३६४ अ, ३६६,३५४, २९४, ३२३, ५०६ भादवि नुसार गुन्हा नोंद केली असून घटनेचा तपास लाखनीचे पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार, पोलिस हवालदार भगवान थेर, पोलिस नायक सुभाष हटवार करीत आहेत. आरोपी हा विवाहित असून लाखनी येथील रहिवासी आहे. तसेच त्याला १ मुलगा व १ मुलगी आहे.