पदाधिकाऱ्यांचा नकार : वसाहत भुईसपाट प्रकरणचुल्हाड : चुल्हाड येथील पाटबंधारे विभागाची वसाहत भूईसपाट प्रकरण अंगलट येत असल्याचे कारणावरून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असताना अडीच महिन्यांपासून फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.चुल्हाड येथे असणारी पाटबंधारे विभागाची वसाहत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात अडथडा ठरत असल्याचे कारणावरून भुईसपाट करण्यात आली. वसाहत भुईसपाट करताना साधी सुचना व शहनिशा ग्रामपंचायत तथा पाटबंधारे विभाग मार्फत करण्यात आली नाही. या वसाहतीची ग्रामपंचायतच्या नमुना आठमध्ये नोंद असताना वसाहत भुईसपाट करताना या दस्तऐवजाची साधी तपासणी करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या देखरेख व नियंत्रणात प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकाम करण्याचे कामांना गती देण्यात आली आहे. या इमारतीचे कंत्राट अजय साकुरे नामक कंत्राटदाराला देण्यात आले आहे. दरम्यान अमिन या कर्मचाऱ्याचे निवाऱ्यावरच जेसीबी मशिन धावली आहे. त्यांचा निवाराच हिसकाविण्यात आला आहे. यामुळे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी शासकीय संपत्तींची नासधुस केल्याप्रकरणी सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फौजदारी गुन्हे दाखल व शाखा अभियंता या तक्रारकर्त्याला न्याय देताना पोलीस प्रशासन चांगलाच चक्रावला आहे. या प्रकरणाला थेट पोलीस प्रशासनाने अडीच महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश प्राप्तीसाठी ठेवले आहे. सामान्य जनतेच्या बाबतीत हाच निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला असता काय, अशा चर्चा नागरिकांत सुरू झालेला आहे. कायदा सर्वांना समान असताना तक्रारकर्ते शाखा अभियंता व पाटबंधारे विभागाला पोलीस प्रशासनाने अद्याप न्याय दिला नाही.दरम्यान दोन्ही बाजुने अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. पाटबंधारे विभाग वसाहतीची नोंद असणारी पुरावे शोधून काढण्यात गुंतली आहे तर, आरोग्य विभाग व कंत्राटदार जागेचे हस्तांतरण झाल्याचे तुणतुणे हलवित आहेत. या संदर्भात पाटबंधारे विभागाने कार्यकारी अभियंता यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वसाहत भुईसपाट प्रकरणात विविध भादंवि अंतर्गत कलावतांची आठवण पत्रातून करून दिली आहे. आरोग्य विभाग, कंत्राटदार व पाठबंधारे विभाग यांच्यात कलंगीतुरा सुरू झाला असताना पोलीस प्रशासनाने टोकाची भूमिका घेतले नसल्याने चर्चा सुरू झालेल्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामाला कुणाचा विरोध नाही. जागेचा वाद नाही. बांधकामाच्या गुणवत्तेवर कुणाचा आक्षेप नाही. (वार्ताहर)या प्रकरणात जिल्हाधिकारी यांचे निर्देश प्राप्त झाले नाही. निर्देश प्राप्तीनंतर कारवाईची दिशा ठरणार आहे.-सुरेश मुंडले, तपास अधिकारी पोलीस स्टेशन, सिहोरा.वसाहत भुईसपाट करताना साधी मंजुरी घेणारे पत्रव्यवहार करण्यात आले नाही. ही वसाहत ग्रामपंचायतच्या मालकीचे नाही. या प्रकरणात पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखविणे चुकीचे असून भुईसपाट करताना कुणी पदाधिकारी हजर नव्हते.-गुरूदेव पारधी, सदस्य, ग्रामपंचायत, चुल्हाड.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 27, 2016 12:36 AM