लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सद्या सोयी सुविधांचा अभाव असून खेळाडुंनी याबाबत अनेकदा कैफियत मांडली. भंडारा जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू असून त्यांना उत्तम दर्जाचे मैदान असावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलाला राज्यातील उत्कृष्ट क्रीडा संकुल करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी प्रतिपादन केले. यासाठी लवकरच जिल्हा क्रीडा संकुल समिती व खेळाडू यांच्यात बैठक बोलाविली जाईल, असे ते यावेळी म्हणाले.जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध क्रीडा संघटना यांचे संयुक्त विद्यमाने सन २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात २९ आॅगस्ट २०१७ हा दिवस हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिन म्हणून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, शिक्षणाधिकारी बी. एल. थोरात, शिव छत्रपती अवॉर्ड विजेते अशोकसिंग राजपूत, मोहन दाढी, पंकज पराते, क्रीडा परिषद सदस्य अॅड. मधुकर बांडेबुचे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले उपस्थित होते.जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, खेळाडूंनी अथक परीश्रम करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भंडारा जिल्ह्याचे नाव लौकीक करावे. तसेच जे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनिय कामगिरी करतील, अशा खेळाडूंना प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. जिल्ह्यात मोठया प्रमाणात खेळाडूंची संख्या आहे. ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी महिला खेळाडूंना प्रोत्साहीत करुन कठीण परिस्थितीमध्ये खेळाच्या माध्यमातून पुढे यावे व जिल्ह्याचे, राज्याचे व देशाचे प्रतिनिधीत्व करावे, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी मार्गदर्शन केले.लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गित गायन करुन उपस्थितांची मने जिंकली. तसेच मोरेश्वर वंजारी व चमुंनी स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारित यशोगाथा सादर केली. यावेळी मान्यवरांच्या हसते विविध क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यातील ६१ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले तर संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोले यांनी केले. उपस्थिताचे आभार क्रीडा अधिकारी दिलीप ईटनकर यांनी मानले. या कार्यक्रमास खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थीनी क्रीडा मार्गदर्शक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील उत्कृष्ट क्रीडा संकुल करण्यासाठी प्रयत्नरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:34 AM
येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सद्या सोयी सुविधांचा अभाव असून खेळाडुंनी याबाबत अनेकदा कैफियत मांडली.
ठळक मुद्देसुहास दिवसे : राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा, उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव