शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

अवैध उत्खननाला अधिकाऱ्यांचाच छुपा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

तालुक्यात आष्टी ते ढोरवाडापर्यंत असलेल्या वैनगंगेच्या पात्रात आजही दररोज कोणताही लिलाव नसताना ३०० ते ४०० ट्रक अवैधपणे रेती उपसा सुरु आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या सहकार्याने तालुक्यात रेतीचोरी सुरु आहे. ही बाब तालुक्यातील शासकीय यंत्रणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रेती उत्खननातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देअधिकारीच करतात टाळाटाळ : कुंपणच शेत खात असल्याचा नागरिकांनी केला आरोप, महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात मॅग्निज, मुरुम, रेती, डोलामाईट खनिज मुबलक प्रमाणात आढळत असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध उत्खनन होत आहे. खनिज संपत्तीचे मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना शासनाकडून कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही.भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर तालुक्यात सर्वाधिक खनिज संपत्तीचे साठे आहेत. मॅग्निज वगळता रेती, मुरुम व इतर खनिजे कमी जास्त प्रमाणात सर्वत्र आढळतात. त्यामुळे तालुक्यामध्ये अवैध उत्खननाचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक तुमसर तालुक्यात दिसून येते. तालुक्यात आष्टी ते ढोरवाडापर्यंत असलेल्या वैनगंगेच्या पात्रात आजही दररोज कोणताही लिलाव नसताना ३०० ते ४०० ट्रक अवैधपणे रेती उपसा सुरु आहे. मध्यप्रदेशातील वाळू माफियांच्या सहकार्याने तालुक्यात रेतीचोरी सुरु आहे. ही बाब तालुक्यातील शासकीय यंत्रणचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रेती उत्खननातून लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यात अवैध उत्खनन भर दिवसा अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर होत असताना राजकीय दबावापोटी तर अधिकारी कारवाई करण्यासाठी घाबरत तर नाहीत ना असा सवाल विचारला जात आहे. मोठ्या प्रमाणात रेती तस्करांकडून पैसे मिळत असल्याने गत काही दिवसांपासून तालुक्यात उत्खनन सुरु आहे. अनेक ठिकाणी मुरुम नाही त्या ठिकाणची परवानगी देऊन अन्यत्र मुरुम उत्खनन करण्याचा सपाटा अनेक मुरुम उत्खनन तस्करांकडून सुरु आहे. याबाबत तहसीलदारांना माहिती दिली असता कारवाई करण्याऐवजी कंत्राटदाराकडे नाव जात असल्याने अनेकदा गुंड प्रवृत्तीच्या माणसांकडून सर्वसामान्यांना दमदाटी केली जाते. असाच प्रकार शनिवारी तालुक्यातील देव्हाडी परसवाडा परिसरात शेतशिवारात एका ठिकाणी जेसीबीने मुरुमाचे उत्खनन सुरु असताना अनुभवाला आला. तुमसरच्या तहसीलदारांना फोनवरून माहिती दिल्यानंतर मी माहिती घेतो असे सांगितल्यानंतर उत्खनन करणाऱ्या व्यक्तींनी काही वेळातच दमदाटी केल्याने कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हितसंबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धमकविले जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.प्रशासकीय अधिकाऱ्यांची डोळेझाक होतेयतुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मॅग्निज, रेती तसेच मुरुमाचे अवैध उत्खनन सुरु आहे. परंतु अधिकारी वैयक्तिक स्वार्थापोटी अवैध उत्खननाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. अनेकदा कारवाई केली असता राजकीय हेवेदाव्यातून अधिकाऱ्यांवरच अनेकदा दबाव आणला जातो. तालुक्यात वाढलेल्या अवैध उत्खननाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. गत काही दिवसांपासून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तुमसर तालुक्यातील अवैध उत्खननावर आळा घालावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Excavationउत्खनन