दोन पद रिक्त : नागरिकांची कामे खोळंबली
पालोरा (चौ.) : पवनी तहसील कार्यालयात मागील बऱ्याच दिवसापासून नायब तहसीलदारांचे दोन पदे रिक्त आहेत. तहसीलदार नरेंद्र राचेलवार बऱ्याच दिवसापासून रजेवर असल्यामुळे येथील नायब तहसीलदार महेंद्र वाकलेकर प्रभारी तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत. पवनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांचे दोन पदे रिक्त असल्यामुळे येथील अव्वल कारकून चरणदास शेंडे हे नायब तहसीलदाराचा कारभार सांभाळीत आहेत. दोन पदे रिक्त असल्यामुळे येथील कामगाराजांचा खेळखंडोबा होत असल्याचे येथे चित्र पाहायला मिळत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.पवनी तालुक्यात १५८ गावाचा समावेश असून ८ रेतीघाट आहे. रेतीचोरणाऱ्यावर नियंत्रण ठेवणे, जनतेचे निवेदन स्वीकारणे, शिधापत्रिकेचे कामे, मुलासाठी शैक्षणिक कामसाठी लागणारे दाखले असे अनेक कामे या कार्यालयांतर्गत केले जाते. येथील तहसीलदार रजेवर असल्यामुळे कार्यालयाचा कामकाज नायब तहसीलदारांवर सांभाळीत आहे. अव्वल कारकुनाकडे शिधापत्रिकेचे काम असतानी सुद्धा त्यांना नायब तहसीलदाराचा कारभार सांभाळावे लागत आहे. त्यामुळे अनेक प्रकरणाचे कामकाज लांबणीवर जात आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)