नियंत्रण : आरटीओची कारवाईभंडारा : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १ जुलैपासून वायुवेग पथकामार्फत स्कुल बसेस व आॅटो रिक्षा यांची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुलबस करीता विनियम ) नियम २०११ च्या तरतूदींचा भंग करणाऱ्या स्कुल बसेस आणि आॅटो रिक्षांवर कडक कारवाई करण्यात येईल. आसनक्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतुक करणे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आलेली फीटनेस सर्टिफिकेट, वेग नियंत्रक तपासणी, वाहन चालकांचे लायसंस, प्राधिकारपत्र, गणवेश, सहवर्ती प्रथम उपचार पेटी, अग्नीशामक उपकरणे, आपतकालीन खिडकी/ दरवाजा, शालेय बसमध्ये प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी इत्यादी तपासण्यात येतील. पालकांनी सुरक्षितता मानकांचा भंग करणाऱ्या शालेय बस तसेच अवैध प्रवासी वाहने आणि आॅटोरिक्षा यामधून पाल्यास पाठवू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले. (प्रतिनिधी)
आॅटोरिक्षा व बसेस तपासणी मोहीम
By admin | Published: June 30, 2015 12:48 AM