पांजरा व बोरी हे गाव अगोदर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र पालोरा येथे जोडलेले होते. शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइनही करण्यात आले होते; परंतु पालोरा येथील धान खरेदी केंद्रावर गोडाऊन उपलब्ध नसल्याने पांजरा व बोरी हे गाव नंतर करडी केंद्राला जोडले गेले; परंतु अजूनही करडी केंद्रावर पांजरा, बोरी येथील शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आलेली नाही. शेतकरी धान खरेदी केंद्रावर गेले असता केंद्र संचालकाकडून टाळाटाळ केली जात आहे. विरोधाभासामुळे शेतकऱ्यांनी धानाचा काटा कुठे करायचा, असा पेच निर्माण झाला आहे. धान खरेदी तात्काळ करण्याची मागणी आ. राजू कोरेमोरे, जिल्हाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, मोहाडी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सचिन साठवणे, लखपती साठवणे, परसराम लांडगे, मोनू साठवणे, वातू साठवणे, अण्णा साठवणे, उत्तम साठवणे, मारुती रोकडे, राजकुमार चौरागडे, सुनील राऊत, राजकुमार माटे, अजय रोकडे, श्रीराम राऊत, बाबूलाल राऊत, मनोहर राऊत, दादाराम चांदेवार, तेजराम राऊत उपस्थित होते.
पांजरा व बोरी येथील धान खरेदीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:23 AM