भूमिअभिलेख कार्यालयात अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या गलथानपणा, मनमानी कारभार व अरेरावीपणामुळे व वेळेवर कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आखीव पत्रिका तीन दिवसात मिळायला पाहिजे, असा नियम असताना दहा-पंधरा दिवस मिळत नाही. साधारण, तात्काळ व अतितात्काळ मोजणी करायची असल्यास एक महिन्याने मोजणीची चालन, एक-दोन महिन्याने प्रत्यक्ष मोजणी तारीख व सहा महिने किंवा वर्षभरानंतर मोजणी होते, क प्रत आठ दिवसात मिळायला पाहिजे, ती एक- एक महिना मिळत नाही, सहा सहा महिने वारसाण व खरेदी-विक्रीचे फेरफार होत नाही, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्यासाठी लागणारे दस्तऐवज ते तीन दिवसात मिळायला पाहिजे ते एक- एक महिना मिळत नाही.
नागरिकांना फारच त्रास सहन करावा लागत आहे म्हणून आज जिल्हाधिकारी भंडारा तहसीलदार पवनीमार्फत निवेदनाद्वारे भूमिअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची चौकशी करून नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा भारतीय जनता पार्टी ताला ठोको आंदोलन करेल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील या आशयाचे पत्र तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष मोहन सुरकर, राजेंद्र फुलबांधे, संदीप नंदरधने, शरद देव्हाळे, प्रकाश कुर्जेकर, हिरालाल वैद्य, लोकेश दळवे, परसराम हुकरे, शंकर सुरपान उपस्थित होते.