शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

भूसंपादनाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ

By admin | Published: May 17, 2017 12:20 AM

येथील महिला शेतकरी शामकला अशोक गभणे यांची शेतजमीन कुशारी येथे असून ...

शेतकरी संतप्त : बावनथडी उपविभागाकडून महिला शेतकऱ्यांना त्रासलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : येथील महिला शेतकरी शामकला अशोक गभणे यांची शेतजमीन कुशारी येथे असून त्यांच्या शेतातील ०.३९ हेक्टर आर जागेतून बावनथडी प्रकल्पाचे नहर गेलेला आहे.नहरासाठी जागा संपादीत केल्याचा त्यांना नोटीस सुद्धा देण्यात आला. भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणीसुद्धा करण्यात आली. मात्र संबंधित कार्यालयातील अभियंता आकांक्षा सिंग या संबंधित महिला शेतकऱ्याला संपादीत जमिनीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असून मागील एस महिन्यापासून महिला शेतकऱ्याला कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावण्यात येत आहे. असा आरोप शेतकरी महिलांनी पत्रपरिषदेत केला. शामकला अशोक गभणे यांची शेतजमिन संपादीत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कलम एकचे नोटीस देण्यात आले होते. त्यानंतर उपविभागीय कार्यालय, बावनथडी उजवा कालवा उपविभाग क्रमांक ५ तुमसर पत्र क्रमांक १२५९ नुसार राघो गायधने व शामकला गभणे यांची ०.४६ हेक्टर आर जागा संपादीत करण्याचे पत्र देण्यात आले. पुन्हा पत्र क्रमांक १२५९ नुसार ०.४६ आर जागा संपादीत करण्यासाठी संमती पत्र दाखल करण्याचे तसेच प्रती हेक्टर ६ लक्ष, ३८ हजार ६०१ प्रमाणे ०.४६ हेक्टर आर जागेचे १४ लक्ष ६८ हजार ७८२ रुपये किंमत सुद्धा काढण्यात आली. त्यामुळे शामकला गभणे या संमतीपत्र लिहून देण्यासाठी गेल्या असता त्यांना अगोदर जमीन मोजण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे शामकला गभणे यांनी भूमिअभिलेख कार्यालय मोहाडी येथे मोजणी शुल्क भरूनजमिनीची मोजणी केली. भूमिअभिलेख कार्यालयाच्या मोजणी पत्रानुसार शामकला गभणे यांची ०.३९ आर व राघो गायधने यांची ०.७ आर जागा नहरात संपादीत झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मोजणी पत्राची नक्कल घेऊन बावनथडी उपविभागात गेल्यावर तेथील संबंधित अभियंता आकांक्षा सिंग यांनी पुन्हा त्या महिला शेतकऱ्याला उडवाउडवीचे उत्तरे देवून मोजणीचे पत्र चुकीचे असल्याचे सांगून पुन्हा आम्ही मोजणी करू असे सांगून परत पाठविले. काही दिवसानंतर पुन्हा त्या महिला शेतकरी संबंधित कार्यालयात गेल्या असता त्यांना तुमची तेवढी जागा नहरात गेली नसल्याचे सांगून ०.२७ आर जागाच नहरात गेली असल्याचे अभियंता आकांक्षा सिंग यांनी सांगितले. हे ऐकून शामकला गभणे यांना धक्काच बसला. ०.३९ आर जागा संपादीत केल्यावर सुद्धा जागा कमी संपादीत केल्याचे सांगण्यात येत असल्याने त्या महिला शेतकऱ्याची मानसिक स्थिती ढासळल्यासारखी झाली आहे. इतर शेतकऱ्यांना संपादीत जागेचे पूर्ण पैसे देण्यात आले. मात्र शामकला गभणे यांनाच मोबदला देण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे असा प्रश्न त्यांनी पत्रपरिषदेत उपस्थितकेला. मागील एक महिन्यात १५ ते २० वेळा बावनथडी प्रकल्प उपविभागीय तुमसर येथे चकरा माराव्या लागल् या. सातबारा वर नाव वेगळे करण्यात आले. भूमिअभिलेख कार्यालयाद्वारे जागेची मोजणी सुद्धा केली. त्यांनी जसे सांगितले तसे सर्व दस्तऐवज त्या कार्यालयात जमा केले तरी संपादीत जागेचे पैसे देण्यास अभियंता आकांक्षा सिंग या टाळाटाळ करीत आहेत असा आरोप त्यांनी पत्रपरिषदेत केला असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण त्यांनी येथीलआमदार चरण वाघमारे यांना सुद्धा सांगितले व आमदारांनी संपूर्ण कागदपत्रे तपासून ०.३९ आर जागेचा मोबदला देण्याच्या सूचना सुद्धा अभियंता आकांक्षा सिंग यांना केल्या. मात्र अभियंता सिंग यांनी आमदारांच्या सूचना सुद्धा केराच्या टोपल्यात टाकल्या व ०.३९ हेक्टर आर जागेचा मोबदला देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. बावनथडी उजवा कालवा उपविभाग तुमसरचे सहाय्यक अभियंता आकांक्षा सिंग यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तीन वेळा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.