पालांदूर येथील मृत्यू पडलेल्या कोंबड्यांचे नमुने पुणे येथे बर्ड फ्लूच्या तपासणीकरिता पाठविले आहे. मात्र अहवाल अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे ७९ कोंबड्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी नगराळे यांचे त्या पोल्ट्री फार्मवर नियमित लक्ष असून दररोजचे अहवाल जिल्हा, तालुका प्रशासनाला कळविला जात आहे. जनसामान्य व्यक्तीनेसुद्धा बर्ड फ्लूची धास्ती घेतलेली आहे. पुणे येथील लेबॉरेटरीमध्ये गेलेले नमुन्याचे अहवाल शुक्रवारपर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र तीन दिवसानंतर ही अहवाल न आल्याने प्रशासनासह जनसामान्यांनासुद्धा चिंतेने घेरलेले आहे. आधी कोरोना काळात पोल्ट्री फार्म धारक संकटात सापडले होते. त्यातून काहीसा दिलासा घेत ,महिने दोन महिन्याच्या काळानंतर पुन्हा बर्ड फ्लूचे संकट घोंगावत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे.
बॉक्स
आठवडी बाजार बंद का?
पालांदूर येथे शनिवारला आठवडी बाजार असतो. पालांदूर चुलबंद खोऱ्यात येत असल्याने सुमार क्षेत्रात भाजीपाल्याची लागवड केलेली आहे. स्थानिक ठिकाणी भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. शेतकरीवर्ग शनिवारच्या आठवडी बाजाराच्या निमित्ताने भाजीपाल्याचे योग्य ते नियोजन करतो. मात्र प्रशासनाने आठवडी बाजारावर प्रतिबंध आणल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे.
‘बर्ड फ्लू हा रोग ' एव्हिअन इन्फ्लूएंझा टाईप अ' या विषाणूमुळे होतो. या विषाणूंच्या प्रथिनांचे १६ एच आणि ९ एन प्रकार असून यापैकी एच ५ आणि एच ७ उपप्रकारच तीव्र रोगकारक असल्याचे आतापर्यंतच्या निरीक्षणात दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.