अध्यक्षस्थानी महाज्योतीचे संचालक व राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य डॉ. बबनराव तायवाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार ॲड. अभिजित वंजारी, शिक्षण महर्षी खुशालराव पाहुणे, संघर्ष वाहिनीचे संघटक दीनानाथ वाघमारे, शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष मिलिंद वानखेडे उपस्थित होते. कोविड काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवत शिक्षकांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. शिक्षकांच्या कार्याचे विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने केलेले कौतुक व्याख्यानासारखे आहे, असे मनोगत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले.
राज्यभरातून २२ प्रतिभावंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यात भंडारा जिल्ह्यातून माध्यमिक गट-दिव्यांग क्षेत्रातून दिनेश माणिकराव गेटमे यांना पुरस्कार प्राप्त झाला. प्रास्ताविक शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी केले. संचालन खिमेश बढिये यांनी तर आभार रूपाली मालोदे यांनी मानले.