दिवसेंदिवस रेल्वे रुळावर होणाऱ्या अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे रुळावर बेफिकीर वावरणाऱ्या परिसरातील नागरिकांचा यात हकनाक बळी जात आहे. रेल्वे रुळावर फिरायला जाणे व रेल्वे रुळावर बसून टवाळक्या करण्याच्या वाढत्या प्रकारामुळे जीवहानी सारख्या घटना वाढल्या आहेत. याबरोबर धावत्या रेल्वे गाड्यावर कुतूहल म्हणून होणारी दगडफेक प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. रेल्वे रुळाच्या नजीक असलेल्या वस्त्यातील काही टवाळखोर धावत्या रेल्वेवर दगडफेक करून प्रवाशांचे मोबाइल लंपास करीत असल्याचे घटना वाढल्या आहेत. यावर अंकुश लावण्यासाठी रेल्वे सुरक्षा विभागाकडून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त पंकज चूघ यांच्या संकल्पनेतून जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. रेल्वे लगतच्या परिसरातील नागरिकांनी जीवहानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एस. दत्ता यांनी केले. यावेळी उपनिरीक्षक दीपक कुमार, सहायक उपनिरीक्षक ओ. सी. शेंडे, पाहुणीचे सरपंच हरिभाऊ धुर्वे, लावेश्वरचे सरपंच अर्चना गणेश काळे उपस्थित होते.
210721\img-20210721-wa0080.jpg
नागरिकांना अपघात टाळण्यासाठी माहिती देताना सुरक्षा दलाचे अधिकारी