आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले. त्यांना जाणीवपूर्वक संकुचित केले, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठ टिचर असोसीएशनचे माजी सचिव डॉ. एकनाथ कठाळे यांनी व्यक्त केले.कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपंप येथील सूजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक विचार या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जी. डी. टेंभरे, डॉ. डी. व्ही. नाईक, प्रा. अकोश चवरे, डॉ. अजयकुमार मोहबंशी, डॉ. जगजीवन कोटांगले आदी उपस्थित होते.यावेळी कठाळे यांनी, चातुर्वण्य व्यवस्थेने त्यांच्या विद्वतेला न्याय दिला नाही. चातुर्वण्य व्यवस्था कालही होती आणि आजही आहे. फक्त माणसे बदलली. चातुर्वण्य व्यवस्थेचे स्वरुप तेच आहे. बाबासाहेबांच्या विचाराला जातीयतेच्या तराजूत न तोलता विवेकबुध्दीच्या तराजूत तोलले पाहिजे. त्यांनी जो धम्म स्विकार केला त्यातच त्यांच्या उच्च वैज्ञानिक विवेकांची प्रचिती येते. धम्म म्हणजे माणसाला माणसासारखे जगालय शिकविणारा उच्च वैज्ञानिक विचार होय. खरे तर भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द या दोन्ही महामानवाचे विचार कृतीतून उतरविले तर आपला देश खºया अर्थाने शक्तीशाली होईल. त्यामुळे देशाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अवस्था समाधानकारक बदलली नाही, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. अकोश चवरे यांनी, मुलभूत मानवी मूल्याची पूर्ती शिक्षणातूनच होईल. आत्मविश्वास क्रांती व परिवर्तन हे शिक्षणातूनच होते एकूण ज्ञान हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे मानसापेक्षा, पत्नीपेक्षा विद्येवर प्रेम करा. कारण विद्या हे आपले पहिले दैवत आहे. सामाजिक व आर्थिक दुखण्याचे ते औषध आहे. म्हणून समाजाला नैतिक मूल्यधिष्ठीत शिक्षण दिले जावे. त्याशिवाय मानवाचा विकास असंभव आहे.डॉ. डी. व्ही. नाईक यांनी, डॉ. आंबेडकरांनी दलित पददलितांना जो सन्मान मिळवून दिला व देशालाही राज्यघटना देवून जे महान कार्य केले त्याला दुसरे तोड नाही. डॉ. जी. डी. टेंभरे यांनी, अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारावर प्रकाश टाकताना म्हणाले की, डॉ. आंबेडकराचे शैक्षणिक विचार व शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना मौलिक प्रेरणादायी आहेत. याची जाणीव विद्यार्थ्यांनी मनोमनी ठेवून अध्ययनाची वाटचाल करावी.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले यांनी केले. संचालन डॉ. रत्नपाल डोहणे यांनी केले. आभार डॉ. सी. पी. साखरवाडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रा. देवराम डोरले, डॉ. आर. टी. पटले, डॉ. आर. एन. मानकर, प्रा. वीजय गणविर, डॉ. सुनिता रविदास, डॉ. साधना वाघाडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
बाबासाहेब आंबेडकरांना भारतीयांनी संकुचित केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:07 AM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले.
ठळक मुद्देएकनाथ कठाळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे उद्घाटन