शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांचे विचार अंगिकारा

By admin | Published: April 16, 2017 12:17 AM

देशाच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले ....

राजेश काशीवार यांचे प्रतिपादन : शिवनी (मोगरा) येथे डिजीधन मेळावाभंडारा : देशाच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान तयार केले त्यामुळेच आज देशाचा व देशातील सामान्य नागरिक, दलित, पीडित व शोषित वर्गाचा विकास शक्य झाला. विकसित भारताची संकल्पना साध्य करण्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत विकास गरजेचा असून शासनाच्या प्रत्येक योजनांची अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश काशीवार यांनी केले.लाखनी तालुक्यातील शिवनी (मोगरा) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय डिजीधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मिश्रा, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय बागडे, स्टेट बँकेचे जिल्हा शाखा व्यवस्थापक कुळकर्णी, खंडविकास अधिकारी साकोली ब्राम्हणकर,शिवणी (मोगरा) च्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे, पद्माकर बावणकर, मुख्याध्यापक महेंद्र राऊत, बोरकर, भीमराव खांडेकर उपस्थित होते.आमदार काशीवार पुढे म्हणाले की, जीवन सुखमय बनविण्यासाठी कॅशलेस व्यवहार आवश्यक असून यामुळे भ्रष्टाचारावर आळा बसेल व आर्थिक विकास साध्य करण्यात मदत होईल. शिवणी ग्रामवासीयांनी कॅशलेस व्यवहार सुरु करून संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून यासाठी शिवणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले.शासकीय योजनेनुसार प्रत्येक राशनकार्ड हे आधारकार्डशी लिंक करून चौकशी केल्यावर ४२ टक्के राशनकार्ड बोगस ठरले व त्यामुळे शासनची ७०० कोटी रुपयांची बचत झाल्याचे सांगून प्रत्येकाने डॉ.बाबासाहेब आंबेडरांचे आदर्श समोर ठेवून त्यांचे विचार अंगीकृत करावे, असे आमदार काशिवार म्हणाले.यावेळी सुधाकर आडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराने आम्हाला घडविले म्हणून आम्ही उत्तम जीवन जगत आहोत. कॅशलेस योजनेमुळे शिवणीवासीयांना सुविधा उपलब्ध झाली असून पीओएस मशीनची माहिती सर्वांना झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कुळकर्णी व इतर अधिकाऱ्यांनी पीओएस मशीनची माहिती देवून त्यांचे महत्व व उपयोगीतेवर प्रकाश टाकला. शिवणीवासी व परिसरातील १०८ लाभार्थ्यांना पीओएस मशिनचे वाटप करण्यात आले. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, राशन दुकानदारांचा समावेश आहे. कॅशलेस व्यवहार करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन दादू खोब्रागडे यांनी केले तर आभार ग्राम विकास्तार अधिकारी गडपायले यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य बचत गटांचे कार्यकर्ते, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामवासी, महिला, पुरुष तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)