शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

बाबासाहेबांचे विचार अंगिकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:57 AM

माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे,

ठळक मुद्देरवींद्र जगताप : स्मारक समितीतर्फे अभिवादन सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : माणसाने स्वत: विचार केला तर एक व्यक्ती हा सर्व समाजात समानता निर्माण करू शकतो, एवढी शक्ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. परिणामी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार अंगीकारुन ते आचरणात आणले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र जगताप यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती त्रिमूर्ती चौक भंडारा येथे अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्ष वसंतराव हुमणे होते. प्रमुख अतिथी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप , प्रा. डॉ. सच्छिदानंद फुलेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, अविनाश कोटांगले, माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाचे कार्यकारी संचालक करण रामटेके, प्रा. डॉ. जगजिवन कोटांगले, डॉ. विनोद भोयर, विनोद मेश्राम, सुर्यकांत हुमणे, इंजि. कांबळे आदी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान बुध्द व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्रिशरण पंचशील याचे सामुदायीकरित्या वंदना करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रा. डॉ. जगजीवन कोटांगले यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात तीन घटना महत्वाचे असुन त्या म्हणजे स्वातंत्र दिवस, प्रजासत्ताक दिवस व धम्म चक्र परिवर्तनदिवस ह्या मानवी कल्याणासाठी कशा महत्वपूर्ण घटना आहे याचे वर्णन केले. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आॅक्टोंबर १९५६ ला आम्हाला बौध्द धम्माची दिक्षा देवून अनिष्ठ रुढी परंपरेच्या चिखलातून बाहेर काढून सन्मानाचे एक नवे जिवन दिले. तसेच ज्या ज्या देशात भगवान बुध्दाला मानणाारे लोक आहे, त्या देशाची आजवर प्रगती झाली कारण बुध्दाचा धम्म हा विज्ञानवादी धम्म असुन सत्य व शांततेचा पाईक आहे. महेंद्र गडकरी म्हणाले, बाबासाहेबांनी भरकटलेल्या लोकांना माणुसपण आणण्याकरिता धम्मक्रांती घडवून आणली व ही धम्मक्रांती भारताच्या इतिहासात महत्वपूर्ण ठरली. प्राचार्य डॉ. सच्छिदानंद फुलेकर यांनी धम्मचक्र परिवर्तन दिवसाचे महत्व विषद केले व मेडीटेशनवर बोलताना म्हणाले की मेडीटेशन हे बुध्दकालीन आहे व बुध्दाने योग हे प्रथमत: जगाला शिकविले. म्हणूनच आज जगात योगाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. शिक्षणाधिकारी पाच्छापुरे म्हणाले की, प्रज्ञा, शिल, करुणा माणसाने आत्मसात करुन आचरणात आणल्याशिवाय कोणालाही बाबासाहेब कळणार नाही. डॉ. विनोद भोयर यांनी समता स्वातंत्र न्याय हक्क हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते. म्हणूनच बाबासाहेबांनी भगवान बुध्दाचा धम्म स्विकारुन आपल्या जनतेस त्याची दिक्षा दिली. युवराज उके म्हणाले की, मानवाची प्रतिष्ठा हेच मानवाचे जिवमुल्य आहे.अध्यक्ष वसंत हुमणे यांनी सर्व जनतेस धम्मचक्र परिवर्तन दिवसाच्या शुभेच्छा देवून सर्व जनतेने बाबासाहेब व बुध्दाच्या प्रतिज्ञाने पालन करुन आदर्श समाज घळवावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे औचीत्य साधुन स्वयंम सहायता महिला बचत गटाच्या महिलांनी जनतेला भोजनदान दिले.प्रस्तावना व संचालन समिती कोषाध्यक्ष महेंद्र वाहाणे यांनी केले तर आभार बी.सी. गजभिये यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सचिव एम. आर. राऊत, एस. के. भादुळी, मदन बागळे, यशवंत नंदेवर, सुनिल धारगावे, प्रा. रमेश जांगळे, टी.के. नंदागवळी, कैलाश टेंभुर्णे, घुसा मेश्राम, अशित बागडे, निर्मला गोस्वामी आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर