लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय आणि डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील बचपन अ प्ले स्कुल येथे करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक संजय कुंभलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता योगेश पडोळे, खिळेमुक्त भंडाराचे राजेश राऊत, डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या समुपदेशक डॉ.सुहासिनी घोडाकाडे, बचपन प्ले स्कुलच्या दिव्यानी जगवीर, श्रीया करंजेकर, लोकमत जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, शाखा व्यवस्थापक मोहन धवड उपस्थित होते.बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रक्तदान शिबिराला प्रारंभ झाला. सर्वप्रथम संजय नंदूरकर व हिरालाल वैद्य यांनी रक्तदान केले. शहरात जोरदार पाऊस असतानाही या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदात्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक होती. विद्यार्थिनीही कुठे मागे दिसल्या नाही. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींही रक्तदान केले. तब्बल १८ दात्यांनी रक्तदान करून आपल्या सामाजिक जाणिवेचा परिचय करून दिला. यावेळी राहुल हेडाऊ, रिजवान शेख, ज्ञानेश्वर खोब्रागडे, विजय सारडा, मुकेश मंत्री, वसंत लाहोटी, लवकुश लांजेवार, मनिष रामटेके, अतुल निंबेकर, दिलीप लेपसे, दुर्गाप्रसाद पिपरेवार, अरुण कावळे, उत्कर्ष शहारे, विशाल खंगारे, प्रिती मुळेवार, दिव्या टेटे आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन बालविकास मंच जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी तर आभार सीमा नंदनवार यांनी मानले. रक्तदान शिबिरासाठी हेडगेवार रक्तपेढीच्या रेणू भुजटकर, तरुण शाहू, सीमा राघोर्ते यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी बचपन अ प्ले स्कुलचे संचालक राजेश मोहरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
भंडारा येथे रक्तदान करून बाबूजींना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 10:30 PM
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालय आणि डॉ.हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन येथील बचपन अ प्ले स्कुल येथे करण्यात आले होते. यावेळी रक्तदान करून बाबूजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
ठळक मुद्देजयंती कार्यक्रम : लोकमत व हेडगेवार रक्तपेढीचा उपक्रम