भंडारा : घराबाहेर जायचे असेल तर बाळाला डायपर वापरत असल्याने जास्त कपडे जवळ बाळगण्याची गरज नाही. मात्र, बाळ वारंवार डायपर ओले करीत असेल तर ते टाइप वन डायबिटीजची अनेकांना माहिती नसते.
आई-वडिलांना डायबिटीज असेल तर...
आई-वडिलांच्या सदोष जीन्स तयार झाल्यास बाळ वारंवार डायपर ओले करण्याची शक्यता असते. ही लक्षणे ३० वर्षांनंतर त्यांच्यात जाणवू लागतात. पालकांना डायबिटीज असेल तर औषधोपचार करावा.
काय आहेत लक्षणे?
बाळ वारंवार डायपर ओले (लघवी) करीत असेल तर बाळाला तहान जास्त लागणे, ही लक्षणे असू शकतात.
लघवी जास्त होणे, वजन कमी होणे आदी लक्षणे असतात.
बहुतांश दोन वर्षांनंतर बाळांमध्ये ही लक्षणे दिसून येतात.
बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात?
दिवसातून सहा ते आठ वेळा डायपर ओले होणे अर्थात लघवी करणे नाॅर्मल आहे. वारंवार डायपर ओले करणे ही लक्षणे एका वर्षात दिसून येत नाही. दोन वर्षांनंतर ही लक्षणे दिसून येतात. याची लक्षणे उशिरा असल्यास ते आनुवंशिक असू शकते. याकरिता तज्ज्ञ डाॅक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावा.
-यशवंत लांजेवार, बालरोगतज्ज्ञ
बाळ डायपर वारंवार ओले करण्याचा प्रकार चार ते सहा वर्षांनंतरच जिल्ह्यात दिसून आले. बाळाला तहान, लघवी अधिक प्रमाणात होत असल्यास त्याचे वजन कमी होते. त्यामुळे बाळाच्या पाल्यांनी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा व योग्य उपचार घेऊन भविष्यातील उद्भवणाऱ्या आजारांना टाळावे.
-हिरालाल निरगूळकर, बालरोगतज्ज्ञ