विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रामस्थांनी अटीतटीच्या अलिखित शर्तीवर सहाव्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले.उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, तहसीलदार गजानन कोकुर्डे नगराध्यक्ष सुनिल मेंढे, ठाणेदार सुरेश ढोबळे अड्याळ, अड्याळ तालुका निर्मितीकृती संघर्ष समितीचे पदाधिकारी, धनंजय दलाल, युवराज वासनिक, डॉ. उल्हास हरडे, अतुल मुलकलवार, देवेंद्र हजारे, मधु गभणे, भारतभुषण वासनिक, डॉ. हर्षवर्धन कोहपरे, राजु मुरकुटे, नंदलाल मेश्राम, बालक गजभिये, राजेंद्र ब्राम्हणकर आदी व समस्त ग्रामस्थ आणि राजकीय पक्ष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.२०१६ पर्यंतचा अहवाल, अड्याळ तालुका निर्मिती संबंधित अहवाल पाठविला आहे. येणाऱ्या चार दिवसात हा अहवाल अद्यावत करुन शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी घेतली. पंरतु या आधी चार जिल्हाधिकारी व आयुक्त असे एकुण पाच अहवाल शासनाकडेच पाठविण्यात आले होते. मग त्या अहवालाचे काय झाले? याबाबत प्रश्न विचारण्यात आले.अहवाल शासनाकडे गेल्यावर त्यावर किती दिवसात विचार व्हायला पाहिजे हे ग्रामस्थांना माहित नसले तरी चार ते पाच अहवाल याआधी शासनाकडे अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात गेले. त्यावर मात्र आजपावेतो निर्णय का घेण्यात आले नाही, याचाही उहापोह झाला.यावेळी जिल्ह्यातील तथा पवनी तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते. अड्याळ तालुका निर्मिती संदर्भात सर्वपक्षीय नेते मंडळीनी मदत करण्याचे ठरविले.अधिकाराच्या व उपस्थित नेते मंडळीच्या शब्दावर विश्वास ठेवून आमरण उपोषण मागे घेत असल्याचे यावेळी आमरण उपोषणकर्त्यांनी आपले मत मांडले.सदर आमरण उपोषण मंडपाच्या समोर ग्रामस्थांच्या रोषालाही नेते मंडळीना सामोरे जावे लागले. परंतु दिलेले आश्वासन गेली ३० वर्षाच्या काळात कुणीही पुर्ण करु शकले नाही. आमरण उपोषण सुटले असले तरी अजुनपर्यंत अड्याळ तालुका निर्मितीचे मिशन पुर्ण झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडण्ुाकीवर ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेल्या ठरावानुसार मतदानावर अड्याळ ग्रामवासी बहिष्कार घालणार आहेत अशी माहिती सुध्दा यावेळी देण्यात आली.शेवटी उपोषण सुटले ग्रामीण रुग्णालयातचार पैकी एकाला चवथ्या दिवशी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे देवराम तलमले यांना भरती करण्यात आले होते. आमरण उपोषण मंडपासमोर चर्चा झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांचा तथा अधिकारी व लहान मोठ्या नेते मंडळीचा ताफा ग्रामीण रुग्णालयात पोहचताच तिथे गर्दीच गर्दी झाली होती. यावेळी तिघांना सुध्दा ईथे आणण्यात आले होते. परंतु आमरण उपोषण कर्ते सर्वांनी समज दिल्यावरही उपोषण सोडायला तयार नव्हते. त्यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार काही वेळ थांबुन परत गेले.उपोषण सोडायला तयार झाले तेव्हा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा ग्रामीण रुग्णालयात येवून चर्चा केली व आमरण उपोषणकर्त्यांना उपस्थित अधिकारी व राजकीय पक्ष नेतेमंडळीनी लिंबू पाणी पाजून आमरण उपोषण सोडविले.
अलिखित शर्तींवर घेतले उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 1:03 AM
अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामवासीयांनी आधी साखळी व नंतर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. यात देवराम तलमले, मन्साराम वंजारी, हरिशचंद्र वासनिक, सचिनराव हिंगे या चारही ज्येष्ठ उपोषणकर्ते व अड्याळ तालुका कृती संघर्ष समिती तथा उपस्थित ग्रामस्थांनी अटीतटीच्या अलिखित शर्तीवर सहाव्या दिवशी आमरण उपोषण मागे घेतले.
ठळक मुद्देमतदानावर बहिष्कार कायम : प्रकरण अड्याळ तालुका निर्मितीचे