भंडारा: लॉकडाऊनच्या काळात विविध वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना घर चालवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर आता संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर गुळाचे दर वधारल्याने सर्वसामान्य गृहिणींची संक्रातीसाठी कसरत होत आहे. मात्र साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. दरवर्षी थंडीची चाहूल लागली की आठवण होते ती मकरसंक्रांतीची. दरवर्षी मकर संक्रांतीच्या वेळी साखरेचे दर वाढतात. मात्र यावर्षी साखरेचे दर स्थिर आहेत. काही ठिकाणी दर घसरले आहेत मात्र गुळाचे दर वाढल्याने संक्रांतीसाठी ग्रामीण भागातील गृहिणींची काटकसर करताना दमछाक होत आहे. सध्या किराणा दुकानात साखरेचे दर ३६ रुपये प्रति किलो आहे. तर गुळाचे दर प्रति किलो ६० रुपये आहेत. पांढरे तीळाचे दर १२० ते १३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे इतर वस्तूंचे दर स्थिर असले तरी गूळ मात्र महागला असल्याने तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे फक्त तोंडीच म्हणावे लागणार आहे. वाढत्या महागाईचा परिणाम विविध सण उत्सवांवरही होताना दिसत आहे. खर्च करताना ग्राहक आता कोरोनानंतर विचार करत आहेत. गूळ आणि मसाल्याचे पदार्थ महागले आहेत. वेलची देखील महागली असल्याचे दुकानदार सांगत आहेत. मात्र साखरेचे दर स्थिर असल्याने संक्रातीचा सण गोड होणार आहे. विविध वस्तूंचा पुरवठा तसेच शेती उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर महागले होते. मात्र आता शितील झाल्यानंतर विविध वस्तूंचे दर खाली आले आहेत. मात्र तरीही साखरेचे दर मात्र स्थिर आहेत. जिल्ह्यात व विदर्भातच उसाचे उत्पादन अल्प प्रमाणात होत असल्याने गूळ मात्र महागलेला दिसून येत आहे.
कोट
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचे दर महागलेले होते. त्यामुळे आणखी दर वाढण्याचा धोकाही वाटत होता. मात्र सध्यातरी साखरेचे दर कमी आहेत. तरीही साखर कमी दरात मिळत आहे. मात्र गुळ महागल्याने खरेदी करताना मोजकाच घ्यावा लागत आहे.
प्रीती गोटेवाडे, गृहिणी.
कोटकोट
लॉकडाऊननंतर विविध वस्तूंचे दर खालावले आहेत. सध्या सर्वच वस्तुंचा पुरवठा सुरळीत होत आहे. त्यामुळे साखरेचे दर तेच आहेत. मात्र गुळ उत्पादन कमी होत असल्याने गुळाचे दर ६० रुपये किलो आहे. तिळाचेही दर कमीच आहेत.
आशिष खेडीकर किराणा दुकानदार, भंडारा
बॉक्स
तिळाचा भाव कमीच
पांढऱ्या तिळाच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. संक्रातीच्या काळातही तिळ महागतील असे वाटत होते. मात्र सध्या १२० ते १३० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. संक्रांतीपर्यंत दर असेच राहतील असे चित्र आहे.
बॉक्सबॉक्स
साखरेचा भाव स्थिर
लोकडाऊन पासून ते अद्याप पर्यंत साखरेचा भाव हे ३६ ते ३८ रुपयांवर स्थिर आहे. आता ३६ रुपये किलो दराने साखरेची विक्री होत आहे. शासनाने हमीभाव दिल्यास साखरेचे दर वाढू शकतात असा अंदाज आहे.
बॉक्सबॉक्स
गुळ व मसाल्याच्या पदार्थ महागले
साखरेचे दर स्थिर आहेत. मात्र संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या घरात वाढ झाली आहे. सध्या प्रति किलो ६० रुपये दराने गुळाची विक्री होत आहे. त्यामुळे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोजकेच ग्राहकांकडून गुळाची खरेदी होत आहे. यासोबतच मसाल्यांचे पदार्थही महागले आहेत.