लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : खडकी ते ढिवरवाडा रस्त्याची वर्षभरातच दूरवस्था झाली असल्याने वाहनधारकांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे.सदर रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडाराकडे असताना विभागाचे याकडे गत काही दिवसापासून दुर्लक्ष होत आहे. परिणामी वर्षभरातच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे त्वरीत रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकातून होत आहे.खडकी ते ढिवरवाडा रस्ता वाहतूकीसाठी अंत्यत धोकादायक ठरत असून अपघाताची भिती वाढली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचा सामना करताना वाहनधारकांची कसरत होते. त्यामुळे हा रस्ता नव्हे मृत्यूमार्ग आहे अशी वाहनधारकांची प्रतिक्रीया आहे.वर्षभरापूर्वीच रस्त्याचे बांधकाम झाले असताना गुणवत्ता व प्रमाणाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु कंत्राटदाराशी असलेल्या संबंधामुळे नागरिकांच्या तक्रारीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करित आहेत.कोका वन्यजीव अभयारण्याचे दरम्यान झालेल्या रस्त्याची सुद्धा आज वाईट अवस्था आहे. अभयारण्यातील रस्त्यावर खोल खड्डे पडले आहेत. परंतु बांधकाम विभाग पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष देणार काय अशी विचारणा होत आहे.
वर्षभरातच खडकी ते ढिवरवाडा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 5:00 AM
खडकी ते ढिवरवाडा रस्ता वाहतूकीसाठी अंत्यत धोकादायक ठरत असून अपघाताची भिती वाढली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचा सामना करताना वाहनधारकांची कसरत होते. त्यामुळे हा रस्ता नव्हे मृत्यूमार्ग आहे अशी वाहनधारकांची प्रतिक्रीया आहे. वर्षभरापूर्वीच रस्त्याचे बांधकाम झाले असताना गुणवत्ता व प्रमाणाकडे जाणीवपूर्वक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
ठळक मुद्देठिकठिकाणी खड्डे : दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष