लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मनसर - तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पूलाच्या बांधकामामुळे वाहतूकीला धोकादायक ठरत आहे. नियमानुसार रिफलेक्टर येथे लावण्यात आले. परंतू रिफलेक्टरचा दर्जा येथे निकृष्ठ दिसत आहे. रात्री रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा व बांधकामाची जागा दिसत नाही. पावसात येथे मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मनसर-तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली. रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल चर खोदून त्याचे मजबुतीकरण सुरु आहे. खापा चौक ते देव्हाडीपर्यंत पाच ठिकाणी लहान पूलांचे बांधकाम सुरु आहे. बांधकामस्थळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचे ऊंच ढिगारे आहेत. ढिगाऱ्याजवळ प्लास्टीक रिफलेक्टर मोठ्या लाकडी काड्यांनी बांधले आहेत. यातील काही रिफलेक्टर दोषपूर्ण आहेत. पाऊसात काहीच दिसत नव्हते. वादळी वाºयात केवळ प्लास्टीक रिफलेक्टर लाकडी काड्यांवर उडत होते. सदर रस्ता चोवीस तास सुरु राहतो. रात्री वाहतूकदारांना सदर मार्ग धोकादायक ठरत आहे.दोन्ही बाजूच्या रस्त्याचा चर खोदकाम केल्यावर केवळ पांढरी पोती (अर्धी) ती थराचवर रस्त्याशेजारी ठेवली आहे. पोतीचे अंतरही जास्त आहे. सहसा चर दिसत नाही. चराच्या वर रस्त्यावर किमान कठडे तयार करण्याची गरज आहे. पूल बांधकाम शेजारी लोखंडी कठडे लावण्याची येथे गरज आहे. मालवाहतूक ट्रक व इतर वाहनांची संख्या जास्त असून चिंचोळ्या जागेतून वाहने जातांनी तारेवरची कसरत करावी लागते.कच्चा रस्त्यावर मुरुम असल्याने वाहने गेल्यानंतर मोठ्या धुराळा उडतो. त्यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा राज्यमार्गाला प्राप्त झाला, परंतु राष्ट्रीय स्तराचे कामे करणे गरजेचे आहे. सदर कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणारी एजेन्सी राष्ट्रीय स्तरावरची आहे. स्थानिक तथा जिल्हास्तरावर येथे कार्यालय नाही अशी माहिती आहे. नागपूर येथूनच येथे नियंत्रण केले जात आहे. जिल्हाधिकाºयांनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.रस्ते सुरक्षीत असावे असा नियम आहे. विकासात्मक कामात सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. अपघाताला आमंत्रण देण्याची स्थिती येथे योग्य हाताळण्याची गरज आहे. रस्त्यावरील रिफलेक्टर दर्जात्मक न लावल्यास आंदोलन करण्यात येईल.-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.
महामार्गावर निकृष्ट दर्जाचे रिफ्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:28 AM
मनसर - तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील पूलाच्या बांधकामामुळे वाहतूकीला धोकादायक ठरत आहे. नियमानुसार रिफलेक्टर येथे लावण्यात आले. परंतू रिफलेक्टरचा दर्जा येथे निकृष्ठ दिसत आहे.
ठळक मुद्देखापा-देव्हाडी शिवारातील रस्ता : रस्त्यावरील पूल बांधकामामुळे धोका