लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी, एससी, एसटी, एनटीव्हीजे व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली असली तरी सत्ताधाºयांनी आरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे बहुजनांना आरक्षणाचा पुरेपूर लाभ मिळाला नाही. देशात ८५ टक्के असलेल्या बहुजन समाजबांधवांनी समाज जागृती करून जन्मजात संविधानदत्त आरक्षणाच्या हक्कासाठी बहुजन समाजाने संघटीत होऊन लढा उभारावा, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे विदर्भ राज्य संयोजक दशरथ मडावी यांनी केले.येथील मुस्लीम लायब्ररी सभागृहात बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने बिएसपीचा आरक्षणविरोधी षडयंत्र पर्दाफाश कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बीआरएसपीचे ज्येष्ठ नेते झेड.आर. दुधकुवर, आप्पासाहेब कावळे, राजेश बोरकर, श्रावण भानारकर, विचारवंत डॉ.वामन शेळमाके, ज्येष्ठ नेते माधवराव फसाटे, जगदीश मडावी, सूर्यकांत हुमणे, जिल्हा प्रभारी डॉ.महेंद्र गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेश महासचिव झेड.आर.दुधकुवर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले पण त्याकाळी दस्तुरखुद्द मराठा समाजाने आरक्षण नाकारले होते. तोच मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे काढत आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ८५ टक्के असलेल्या बहुजन समाजाच्या उत्थानासाठी संविधानात आरक्षणाची तरतुद करून ठेवली आहे. परंतु सत्ताधारी मात्र आरक्षणच बंद करण्याचा कुटील डाव खेळत आहेत. त्यामुळे संविधानदत्त आरक्षणाच्या संरक्षणासाठी बहुजन समाजाने कटीबद्धता बाळगावीसुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत डॉ.वामन शेळमाके यांनी केवळ एससी, एस.टी. समाजाला आरक्षण असून त्यांनाच नोकरी मिळते असे विरोधक समाजामध्ये गैरसमज पसरवित आहेत. ओबीसी समाजबांधवांनी याबाबत विचारमंथन करून आपल्या संविधानदत्त न्याय हक्क अधिकारासाठी संघटीत होऊन सामाजिक क्रांती घडवून आणावीे.खोट्या आदिवासींनी बनावटरित्या जातीेचे प्रमाणपत्र तयार करून मुलनिवासी आदिवासी समाजाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील जागा बळकावली आहे, अशा खोट्या आदिवासींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी परिवर्तनशील विचारांनी संबोधित केले.कार्यक्रमाला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बीआरएसपीचे विदर्भ महासचिव राजेश बोरकर तर संचालन निरज बन्सोड व आभार प्रदर्शन डॉ.महेंद्र गणवीर यांनी केले.
बहुजनांनो, आरक्षणासाठी लढा उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 9:51 PM
भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात ओबीसी, एससी, एसटी, एनटीव्हीजे व विशेष मागासप्रवर्ग प्रवर्गासाठी आरक्षणाची तरतूद करून ठेवली असली तरी....
ठळक मुद्देदशरथ मडावी : बीआरएसपीचा आरक्षणविरोधी षडयंत्र पर्दाफाश कार्यक्रम