२०० फुटापर्यंत मँग्नीजचा साठा : केंद्र शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षामोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील ब्रिटिशकालीन बाळापूर (डोंगरी बु.) येथील खुली मॅग्नीज खाण भूमीगत करण्याकरिता हालचाली सुरु आहेत. मागील १०० वर्षापासून येथे मॅग्नीजचे अविरत ुउत्खणन सुरु आहे. पुन्हा भूगर्भात २०० फूटापर्यंत मॅग्नीजचा साठा असल्याने खुल्या खाणीला भूमीगत खाणीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे. १०० वर्षापूर्वी ब्रिटिशांनी तुमसर तालुक्यातील बाळापुर (डोंगरी बु.), खुली तर चिखला येथे भूमीगत मॅग्नीज खाणींचा शोध लावून उत्खनन सुरु केले होते. मध्यप्रदेशातील तिरोडी येथे यादरम्यान भूमीगत खाण त्यांनी सुरु केली होती. सातपुडा पर्वतरांगात या तिनही मॅग्नीज खाणी आहेत. बाळापूर येथील मॅग्नीज खाण खुली आहे. मागील १०० वर्षापासून मॅग्नीज काढणे येथे अविरत सुरु आहे. सध्या येथे विहिरीसारखे खड्डे तयार झाले आहेत. येथून काढलेला वेस्ट मटेरियल मॉईल परिसरात डम्पींग करण्यात येत आहे. खड्डे झाल्याने धोक्याची शक्यता बळावली आहे. पुन्हा भूगर्भात २०० फुटापर्यंत दर्जेदार मॅग्नीजचा साठा आहे. भूगर्भ संशोधन तथा मॉईलचे वरिष्ठ अधिकारी यांनी सर्व्हेक्षण केल्यानंतर ही खाण सुरक्षेकरीता भूमिगत करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने मॉयल प्रशासनाने कामगार व अधिकाऱ्यांच्या सदनिकाजवळील चांदमारा गावाजवळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या गावात मॉयल कामगारांची वसाहत आहे. ती अन्य ठिकाणी हलविण्यात येणार आहे. मॅग्नीजची विदेशात निर्यातबाळापूर, चिखला व तिरोडी येथील मॅग्नीजच्या खाणी जगात हॉलंडनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील मॅग्नीज देशातील नामवंत कारखान्यात भिलाई स्टील प्लाँट तथा इंग्लड, आस्ट्रेलिया, चीनसह रशियात जातो. ५० ते ५५ ग्रेडच्या अतिशय उच्च दर्जाचे येथील मॅग्नीज आहे, हे विशेष.तुमसर तालुक्यात जगप्रसिध्द मॅग्नीज खाणी आहेत, पंरतु हा संपूर्ण परिसर दारिद्री आहे. स्टार्टअप इंडिया अंतर्गत परिसरात मॅग्नीजवर आधारित उद्योगधंदे सुरु करण्याची येथे गरज आहे. परंतु आतापर्यंत येथे प्रयत्न करण्याची कुणी तसदी घेतली नाही. न्यू इंडिया अंतर्गत येथील बेरोजगार तरुणांना कारखान्याची निश्चितच प्रतिक्षा आहे. बाळापूर परिसरात अतिक्रमणाचा विळखा आहे. भूमीगत खाण हालचालींना वेग आल्यावर येथे कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खुल्या खाणींचे भूमीगत खाणीत रुपांतरीत करण्याचा निर्णय मॉयल प्रशासन व केंद्र सरकार घेते. वेळोवेळी भूगर्भात संशोधक व मोठे अधिकारी मॅग्नीज खाणींना भेटी देतात. भूमीगत खाणीत रुपांतरीत करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होतो.- आर. यु. सिंगखाण प्रबंधक बाळापूर.
बाळापूर खुली मँग्नीज खाण भूमीगत होणार
By admin | Published: March 18, 2017 12:23 AM