महिला राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : ठाणेदारांना निवेदनतुमसर : महिला तसेच युवतीच्या सुरक्षीततेचा उपाय म्हणून पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्यावर त्वरीत बंदी घालून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्याणी भुरे यांच्या नेतृत्वात ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शहरातील नवीन बस स्टॉप जुना बस स्टॉप, बावनकर चौक, मुख्य बाजारपेठ, तांबी चौक, लोटन पोहामिल चौक आदी ठिकाणी अल्पवयीन मुले वाहनावर उच्छाद मांडत शाळा महाविद्यालयमध्ये ये-जा करणाऱ्या मुलींशी असभ्य वागणूक केली जाते. मुलींना सायकलवरून पाडण्याइतपत मजल मारली आहे. कुठे तरी हे थांबणे गरजेचे असून तुमसर पोलिसांनी कठोर पावले उचलीत किमान शाळा सुरू होताना तसेच शाळा सुटताना पोलिसांनी मुलांच्या सुरक्षेतीची काळजी घ्यावी, असे निवेदनात नमूद केले. पालकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आपल्या पाल्यांना वेगावर नियंत्रण घालण्या संदर्भात सुचना द्याव्यात असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सरोज भुरे, योगेश सिंगनजुडे, पमा ठाकूर, निशिकांत पेठे, अंकुर ठाकूर, विजया चोपकर, मिना गाढवे, साखरवाडे, चंदा धार्मिक, रहमतबी मिर्झा, घनश्याम गुप्ता, वासनिक व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलांच्या वाहन चालविण्यावर बंदी घाला
By admin | Published: August 18, 2016 12:23 AM