शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सुज्ञ..." 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
4
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
5
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
6
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
7
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
8
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
9
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
10
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
11
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
12
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
13
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
14
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
15
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
17
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
18
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
19
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
20
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!

मॅगनिज उत्खनन बंदीचा फज्जा

By admin | Published: November 27, 2015 12:51 AM

मॅगनिज उत्खननावर बंदी असली तरी, तुमसर व मोहाडी तालुक्यात महसूल आणि वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे.

माफियांचे प्रस्थ : वन, महसूल व पोलीस विभागाचे अक्षम्य दुर्लक्षतुमसर : मॅगनिज उत्खननावर बंदी असली तरी, तुमसर व मोहाडी तालुक्यात महसूल आणि वन विभागाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. मॅगनिज माफियांचा तालुक्यात प्रचंड सुळसुळाट झाला असून, जिल्हा प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या मॅगनिजची नागपूर जिल्ह्यात वाहतूक करण्यात येत आहे. यात वन विभाग, पोलिस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आशिर्वाद असल्याची चर्चा आहे. तुमसर वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मॅगनिजचे उत्खनन सुरू आहे. वनक्षेत्राच्या रक्षणाची जबाबदारी असलेले वनकर्मचारी व क्षेत्रसहाय्यकांच्या नजरेसमोर अशाप्रकारे उत्खनन सुरू आहे. चोरट्या मार्गाने मॅगनिजच्या खडकाची रात्रीच्या वेळी रामटेकडे वाहतूक केली जाते. रात्रीच्या वेळी हे मॅगनिज ट्रकद्वारे नागपूर जिल्ह्यात पाठविले जाते. जंगलातून खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या कार्यालयासमोरून जातात. परंतु, त्यांची साधी चौकशीही केली जात नाही. परिसरात वन व महसूल विभागाच्या जागेत अवैधपणे मॅगनिज उत्खनन करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. मात्र, हा आदेश पायदळी तुडवून मॅगनिजची चोरी सुरु आहे. यामुळे महसूल व वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तालुक्यात राजरोसपणे होत असलेल्या मॅगनिज चोरीत वन, महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी व राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे संगनमत असल्याने मॅगनिज चोरीला ऊत आला आहे.या चोरट्या व्यवसायात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरीलही मॅगनिज माफियांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यात पर्यावरणविषयक समस्या निर्माण होण्याची भीती आहे.नदीपात्रातून उत्खनन होणाऱ्या रेतीतून जिल्हा प्रशासनाला दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न मिळते. तरी या व्यवसायातील होणारा चोरटा व्यवसाय व त्याला मिळणारी अधिकाऱ्यांची साथ त्यातून बुडणारे महसूल हा विषय आता सर्वश्रूत झाला आहे. एखादा रेतीघाट खरेदी करायचा व त्याला लागून असलेल्या घाटाचा लिलाव होऊ द्यायाचा नाही आणि त्यातून लाखो रुपयांच्या खनिजाची दिवसाढवळ्या चोरी करायाची हा धंदा या क्षेत्रात वषार्नुवर्ष सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)