लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात पर्वतच्या कुशीत हिरव्यागार वनश्री, टेकड्यांच्या पोटातून सतत खळखळणाऱ्या झरा, पर्वतीय सौंदर्य व जवळच रमणीय जलाशय ईत्यादीना आपल्या कवेत सामावून घेणारा बंदरझिरा (आंबागड) आहे. येथे पर्यटकांसाठी एक पवनीच ठरत आहे.तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्यटक येथे मनमुराद आनंद लुटतात. वर्षा ऋतुमध्ये येथील परिसरात हिरवेगार दृष्य, ढगांनी पर्वत परिसर न्हावून नवचैतन्य निर्माण होते. लॉकडाऊन असतानाही काही आनंदाचे क्षण घालविण्यासाठी अधूनमधून भाविक, पर्यटक येथे भेट देताना दिसून आले.गत आठवड्यात येथील झरे, पाण्याची टाकी, नाली आदींची स्वच्छता करण्यात आली. सोबतच डेंटिग- पेंटींग करण्यात आली. परिसरातील मोठे, लहान दगड व वृक्षांची पेंटिंग करण्यात येवून दर्ग्याला नविन स्वरुप आले. दर्ग्यावर येणारे भाविक, पर्यटक परिसर बघून आकर्षित होत आहेत.रस्ते, पाणी, वीज व इतर सोयीसुविधा येथे निर्माण झाल्यास या परिसराचे सौंदर्यीकरण झाल्यास मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक येथे भेट देणारच याकरिता प्रयत्न सुरु आहेत.भंडारा जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने पोरका आहे. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक स्थळे असली तरी याकडे शासन प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने पर्यटन स्थळाचा विकास आजही रखडलेला आहे. तुमसर तालुक्यात बंदरझिरा येथे पर्यटकांना आकर्षित करणारे स्थळ आहे. मात्र येथे पर्यटकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. येथे बाबा सिध्दीक शाह यांचा दर्गा आहे. या दर्ग्यावर मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविकांना येथे येताच मनाची शांती मिळत असल्याचे बोलल्या जात आहे.
बंदरझिरा बनले भाविक, पर्यटकांचे आकर्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM
तुमसर तालुक्यातील बंदरझिरा (आंबागड) येथे अरबस्तान येथून ३०० वर्षांपुर्वी आलेले बाबा सिध्दीक शाह यांची दर्गा आहे. आजूबाजूला घनदाट जंगल, शांत, रमणीय परिसरात स्थित या दर्ग्यावर दूरदूरुन भाविक येतात व शांती, समृध्दीसाठी प्रार्थना करतात. भाविकांसोबतच पर्यटक येथे मनमुराद आनंद लुटतात. वर्षा ऋतुमध्ये येथील परिसरात हिरवेगार दृष्य, ढगांनी पर्वत परिसर न्हावून नवचैतन्य निर्माण होते.
ठळक मुद्देरमणीय स्थळ : सौदर्यीकरणासाठी विविध सोयीसुविधा उपलब्धतेकरीता पर्यटनप्रेमी सरसावले