बॉक्स
गरज आहे त्यांना नाही लस नाही तर दिली कुणाला
जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरणाचे नेमके नियोजन करण्याची गरज होती. मात्र, लसीकरणाबाबत गोंधळाची स्थिती असल्याने आरोग्य प्रशासनाबद्दल बँक कर्मचारी, कृषी कर्मचारी, तसेच अनेक तरुणांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा सातत्याने दररोज अनेकांशी संपर्क येतो त्यांना सहा महिने लोटले तरी अजूनही कोरोना लसीसाठी संघर्ष करावा लागत आहे तर दुसरीकडे लस वेळेत मिळाली नसल्याने योग्य उपचाराअभावी अनेक शासकीय कर्मचाना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याला जिल्हा आरोग्य विभागच दोषी असल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करत आहेत. त्यामुळे आता तरी बँक व कृषी कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्या अशी मागणी आहे.
बॉक्स
मुठीत घेऊन निभावतात कर्तव्य
अनेक बँकांमध्ये विविध कारणांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. दुसरीकडे राज्य शासनाने बँक अत्यावश्यक सेवेत असल्याचे सांगून बँकांना सुटी देण्यात आलेली नाही. बँकेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी हे आपला जीव मुठीत घालून कर्तव्य निभावत आहेत. यांना जिल्हा प्रशासनाने प्राधान्याने लस देण्याची गरज आहे. मात्र, मागूनही लस मिळत नसल्याने आरोग्य प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी बँकेत पैसे गर्दी होत आहे. बँक कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्गाची भीती वाढली आहे