लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येथील राजीव गांधी चौकातील बँक ऑफ इंडिया शाखेलगत असलेले एटीएम गॅस कटरच्या सहायाने फोडण्याचा प्रयत्न रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. प्रयत्न करूनही मशीन फुटली नाही. त्यामुळे संपूर्ण रक्कम सुरक्षित राहिली. भंडारा शहरात एटीएम फोडण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे हा चोरटा तेथून निघून गेला.तो चारचाकी वाहनाने आल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसत असून चेहरा बांधलेला होता.या घटनेची माहिती सकाळी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापनाला झाली. त्यांनी तात्काळ भंडारा शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ्श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु श्वानानेही माग दाखविला नाही. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, भंडारा शहरचे प्रभारी ठाणेदार साठवणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि भंडारा ठाण्याचे डीबी पथक घटनास्थळी पोहचले.भंडारा शहरात एटीएम फोडण्याची ही पहिलीच घटना होय. चोरट्यांना मशीन फोडण्यात यश न आल्याने एटीएममधील रक्कम सुरक्षित राहिली. या एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा दिसत असला तरी तोंडाला स्कार्फ बांधून असल्याने ओळख पटविणे कठीण झाले आहे.एटीएमची सुरक्षा वाऱ्यावरभंडारा शहरात विविध बँकांचे चौकाचौकात एटीएम आहे. बहुतांश एटीएम रामभरोसे दिसत आहे. खासगी बँकांच्या एटीएमसमोर सुरक्षा रक्षक असतो. परंतु राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमसमोर सुरक्षा रक्षकाचा अभाव असतो. रात्रीच्यावेळी येथे कुणीही नसते. सुरक्षा रक्षकाअभावी एटीएमची सुरक्षाच धोक्यात आली आहे.बँकाची सुरक्षा ऐरणीवरऐन निवडणुकीच्या काळात साकोली येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत चोरी झाली होती. चोरट्यांनी तब्बल दोन कोटी रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. विशेष म्हणजे बनावट चाबीने स्ट्राँग रूमचे कुलूप उघडून आतील रोख व सोने लंपास केले होते. यापुर्वीही जिल्ह्यात बँक फोडण्याचा आणि एटीएममध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यानंतरही बँकांनी सुरक्षाच्या योजना केल्या नाही.
बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 6:00 AM
येथील राजीव गांधी चौकात बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेलगतच एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबूक प्रिटींग मशीन आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर एका चोरट्याने या एटीएममध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहायाने एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्धा तास प्रयत्न करूनही यश आले नाही. त्यामुळे हा चोरटा तेथून निघून गेला.
ठळक मुद्देराजीव गांधी चौकातील घटना : गॅस कटरचा उपयोग, रोख सुरक्षित