बॉक्स
शाखा प्रबंधक १२ वाजल्यानंतर येतात बँकेत
गोंड उमरी येथील बँक ऑफ बडोदाचे शाखा प्रबंधक दररोज बारा वाजल्यानंतर बँकेत येतात. तोपर्यंत बँकेतील व्यवहार पूर्णपणे बंद असतात. त्यामुळे शाखा प्रबंधक येईपर्यंत जनतेला दररोज उन्हात ताटकळतत वाट पाहत राहावे लागते. या परिसरात ही एकमेव बँक असून, अनेक गावांचा संपर्क येतो. ही भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नाबार्ड म्हणून एकमेव बँक आहे. बँकेसमोर सावलीची कोणतीही सुविधा नसल्याने खातेदारांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. अशा अवस्थेत जीव जाण्याची भीती आहे. गेल्या काही दिवसांपासून या बँकेत ग्राहकांशी उद्धटपणाने बोलले जाते. मोठ्या व्यापाऱ्यांना मोठीच केस दिली जाते. व्यावसायिकांना फक्त पाच हजार रुपये दिले जात आहेत. ग्रामीण भागातून शेकडो खातेदार दररोज बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी येतात. शेवटी ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राचाच आधार घ्यावा लागतो.